Gold-Silver Rate Today: सोनं खरेदी करायचं आहे तर घाई करा…दरांमध्ये मोठी घसरण, काय आहेत आजचे दर?

आखाती युद्धानंतर सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार झालेले दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दरांमध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. गेल्या 2 दिवसात सोनं-चांदी स्वस्त झाली होती. आज म्हणजे 10 एप्रिल रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.  आदल्या दिवशी, म्हणजे काल दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 1500 रुपयांनी, म्हणजेच सुमारे एक टक्क्याने घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी […]

Gold-Silver Rate Today: सोनं खरेदी करायचं  आहे तर घाई करा…दरांमध्ये मोठी घसरण, काय आहेत आजचे दर?

आखाती युद्धानंतर सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार झालेले दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दरांमध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. गेल्या 2 दिवसात सोनं-चांदी स्वस्त झाली होती. आज म्हणजे 10 एप्रिल रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 

आदल्या दिवशी, म्हणजे काल दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 1500 रुपयांनी, म्हणजेच सुमारे एक टक्क्याने घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 54,900 रुपयांवर आला होता. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी कितपत टिकेल या चिंतेमुळे गुंतवणूकदारांनी नफा कमावला, ज्यामुळे सराफा दरात घसरण झाली.

सोन्याप्रमाणेच चांदीचे दरही आज खाली घसरल्याचे दिसून आले. 10 एप्रिलच्या सकाळी चांदीचे भाव खाली घरून 1 किलोसाठी किंमत 2 लाख 54 हजार 900 रुपये झाले होते. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,51,620 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,38,990 रुपये इतका आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि कलकत्ता मध्ये 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी 1लाख 51 हजार 470 रुपये आणि 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी 1लाख 38हजार 840 रुपये मोजावे लागणार आहेत. आज सकाळच्या सत्रात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. एमसीएक्सवर सोन्याची सुरुवात सुमारे 800 च्या घसरणीने झाली, तर चांदीचा भाव 1700 ने घसरला.

अवघ्या एक दिवसापूर्वी, दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव तब्बल 7800 रुपयांनी, म्हणजेच 3.10 टक्क्यांनी घसरून 2,43,200 रुपये प्रति किलोग्राम झाला होता, नंतर त्यात थोडीफार वाढ दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव 76.24 डॉलर प्रति औंस आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात भारतात चांदीचा दर 4 लाख रुपयांपार गेला होता

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number