आखाती युद्धाचा परिणाम सोनं-चांदीच्या दरांवर दिसून येत आहे. अशातच आता काल अमेरिका-इराण युद्धाला विराम लागण्याची घोषणा झाल्यानंतर सोनं-चांदीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. काल सोन्याचे दर जीएसटी शिवाय1,52,000 वर पोहोचले होते. त्यामध्ये आज तीन हजार रुपयांची घसरण झाली असून ते 1,49,000 पर्यंत खाली आले आहेत. त्याचप्रमाणे चांदीच्या दरात ही सात हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचे दर आज 2,40,000 वर खाली आले आहे.
गुरुवारी, एमसीएक्स गोल्ड जून फ्युचर्स 0.29 % ने घसरून प्रति 10 ग्रॅम 1,51,336 रुपयांवर आले, तर एमसीएक्स सिल्व्हर मे कॉन्ट्रॅक्ट सुमारे1.02% ने घसरून प्रति किलो 2,37,464 रुपयांवर आले. गुडरिटर्न्स वेबसाइटवर, 1 ग्रॅम 24-कॅरेट सोन्याची किंमत 15,148 रुपये आहे. त्याचप्रमाणे, एक किलोग्रॅम चांदीची किंमत 255,000 रुपये आहे.
मुंबई
24 कॅरेट – 1,53,830 रुपये
22 कॅरेट – 1,41,010 रुपये
18 कॅरेट – 1,15,380 रुपये
अहमदाबाद
24 कॅरेट – 1,53,880 रुपये
22 कॅरेट – 1,41,060 रुपये
18 कॅरेट – 1,15,430 रुपये
हैदराबाद
24 कॅरेट – 1,51,480 रुपये
22 कॅरेट – 1,38,850 रुपये
18 कॅरेट – 1,13,610 रुपये
दिल्ली
24 कॅरेट – 1,53,980 रुपये
22 कॅरेट – 1,41,160 रुपये
18 कॅरेट – 1,15,530 रुपये