मुंबई: आज नोव्हेंबर सोमवार रोजी देशाच्या विविध शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये चढउतार कायम दिसत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून 24 कॅरेट सोन्यात कधी वाढ तर कधी घसरण अशी सतत हालचाल सुरू आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात अंदाजे 4 टक्क्यांची वाढ नोंदली गेली होती. जागतिक बाजारातील बदल, फेडकडून डिसेंबर महिन्यात व्याजदर कपातीची शक्यता आणि डॉलर दर कमी होत असल्याने या आठवड्यातही सोन्याच्या दरांमध्ये चढउतार राहू शकतो असे जाणकारांचे मत आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर साधारण 1,25,070 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर चांदी साधारण 1,68,900 रुपये किलोच्या आसपास विकली जात आहे.
विविध शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर वेगवेगळे आहेत. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने 1,25,220 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. मुंबई, कोलकाता आणि जयपूरमध्ये हा दर 1,25,070 रुपये ते 1,25,220 रुपये या दरम्यान आहे. चेन्नईमध्ये 1,25,990 रुपये, तर लखनऊ आणि पटना येथे साधारण 1,25,120 रुपये दर नोंदवला गेला आहे. चांदीची किंमतही बहुतेक शहरांमध्ये 1,68,900 रुपये किलोच्या आसपास स्थिर दिसत आहे. चेन्नईमध्ये मात्र चांदीचा दर 1,74,990 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीत दोन्हीत मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात एक आठवड्यात 4,600 रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली, तर चांदीच्या किमतीत जवळपास 11,000 रुपयांची वाढ नोंदली गेली.
इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 1,24,794 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे, जो मागील आठवड्यात 1,20,100 रुपये होता. यावरून एक आठवड्यात 4,694 रुपयांची वाढ स्पष्ट दिसते. 22 कॅरेट सोन्याचा दरही वाढून 1,14,311 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, जो यापूर्वी 1,10,012 रुपये होता. त्याचप्रमाणे 18 कॅरेट सोन्याची किंमत 90,075 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून वाढून 93,596 रुपये झाली आहे. चांदी देखील मागील आठवड्यातील 1,48,275 रुपये किलोवरून वाढून आता 1,59,367 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. दिवाळीनंतर काही काळ सोने – चांदीचे भाव खाली आले होते, मात्र पुन्हा एकदा बाजारात तेजी परतली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही या आठवड्यात सोने चांदीत वाढ नोंदली गेली. सोने साधारण 4,094 डॉलर प्रति औंस आणि चांदी 50.6 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचली असून, ही किंमत मागील आठवड्याच्या तुलनेत अधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्थिती, डॉलरची कमजोरी आणि व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळे यामध्ये असलेली हालचाल पुढेही कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की सोने दर 1,24,000 रुपये ते 1,27,500 रुपये प्रति 10 ग्रॅम या मर्यादेत चढउतार करू शकतात. स्थानिक बाजारात होणारी सोने खरेदी-विक्री आणि जागतिक आर्थिक घडामोडी यांचा सोने चांदीच्या दरांवर थेट परिणाम होत आहे.
हेही वाचा: Ladki Bahin Yojna : eKYC करण्यासाठी लाडक्या बहिणींची धावाधाव! उरला फक्त एकच दिवस