Gold-Silver Rate Today: सोन्याच्या दरात अचानक घसरण; चांदी पुन्हा महागली, आजचे दर जाणून घ्या

डिसेंबरच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली असली तरी चांदीने उच्चांक गाठत ग्राहकांना धक्का दिला आहे.

Gold-Silver Rate Today: सोन्याच्या दरात अचानक घसरण; चांदी पुन्हा महागली, आजचे दर जाणून घ्या

Gold-Silver Rate Today:  डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून महागाईचा दबाव वाढत असताना सोन्या–चांदीच्या किमतींनी ग्राहकांना निराश केले आहे. महिन्याची पहिली तारीख जबरदस्त वाढ घेऊन आली होती, परंतु दुसऱ्याच दिवशी बाजारात वेगळे चित्र पाहायला मिळाले. सोन्याचे दर किंचित घसरले असले तरी चांदीने पुन्हा एकदा उच्चांकाचा टप्पा गाठत ग्राहकांच्या बजेटला मोठा धक्का दिला आहे.

मंगळवारी सकाळी सराफा बाजार उघडताच सोन्याने मंद सुरुवात केली. अलीकडेच जागतिक बाजारात सोन्याला चांगला आधार मिळत असल्यामुळे दर सतत वाढत्या ट्रेंडमध्ये दिसत होते. अमेरिकेतील व्याजदर कमी होण्याची शक्यता आणि जागतिक गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे सोन्याने मागील काही दिवसांत सहा आठवड्यांतील सर्वोच्च पातळीचा स्पर्श केला होता. त्यामुळे घरगुती बाजारातील ग्राहकांनाही दर वाढण्याचीच अपेक्षा होती.

दरम्यान, गोल्डमन सॅक्सच्या सर्वेक्षणातील निष्कर्षांनी सोन्याबाबतचा कल आणखी स्पष्ट केला आहे. सुमारे 70 टक्के आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी मांडले की 2026 पर्यंत सोन्यात प्रचंड तेजी राहू शकते. यातील 36 टक्के  गुंतवणूकदारांचा असा अंदाज आहे की पुढील दोन वर्षांत सोन्याचा दर प्रति औंस तब्बल 5,000 डॉलर्सच्या वर जाऊ शकतो.

हेही वाचा: Freebies Policy : मोफत योजना ही राजकीय अपयशाची कबुली, मतांसाठी देशाची तिजोरी रिकामी; माजी गव्हर्नर सुब्बाराव यांनी सुनावलं

मात्र, देशांतर्गत बाजारात आज सोन्याच्या वायदा किमतीत मर्यादित चढ-उतार पाहायला मिळाले. सोन्याचा वायदा सुमारे 1,27,500 रुपयांवर व्यवहार करत असून कालच्या तुलनेत त्यात 600–650 रुपयांची वाढ नोंदवली गेली. परंतु, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात सराफा बाजारात घट नोंदवली गेली आहे.
सध्या 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 1,19,350 रुपये तर 24 कॅरेटचा दर 1,30,200 रुपये आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही 280 रुपयांची सूट काही प्रमाणात दिलासा देणारी असल्याचे सराफांचा मत आहे. विशेषत: लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ही घट ग्राहकांना बाजारात आकर्षित करू शकते.

पण चांदीने मात्र आजही आपला ‘तोरा’ कायम ठेवला आहे. चांदीच्या किमतीत आज घसरण दिसत असली तरीही ती ऑलटाईम हायच्या आसपास पोहोचली आहे. चांदीचा वायदा आज 1,76,198 रुपयांवर पोहोचला आणि त्यात तब्बल 2,000 रुपयांची घट नोंदली गेली. तरीही तिचा दर अत्यंत उच्च राहिल्यामुळे चांदी दागिने आणि नाणी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्या आहेत.

हेही वाचा: Share Market Update : शेअर मार्केटची सुरुवात लालेलाल; सेन्सेक्स 170 अंकांनी घसरला, तर निफ्टी 26,145 च्या खाली
 

विशेषत: मोठ्या प्रमाणात चांदी खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना हा उतार तात्पुरता असण्याची शक्यता वाटते. चांदीचा औद्योगिक वापर मोठ्या प्रमाणात असल्याने तिच्या किमतीत येणारी वाढ सामान्य ग्राहकांच्या खिशावर अधिक परिणाम करते.

सराफा बाजारातील जाणकारांच्या मते, लग्नसराई आणि उत्सवी खरेदीमुळे सोन्या–चांदीची मागणी सध्या वाढलेली आहे. त्यामुळे दरात मोठी घसरण होण्याची शक्यता अल्प आहे. मात्र आजची किंचित घट खरेदीदारांसाठी छोटासा “ब्रेक” ठरू शकते. आगामी काही दिवसांत आंतरराष्ट्रीय संकेतांनुसार दर आणखी बदलू शकतात. त्यामुळे सोन्या–चांदीचे भाव लक्षपूर्वक पाहणे आवश्यक आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number