LIC Best Scheme: कामही मिळणार अन् कमाईही होणार! LIC च्या ‘या’ योजनेत महिलांना दरमहा मिळतात 7000 रुपये

या उपक्रमांतर्गत महिलांना स्वतःचे काम करत असतानाच दरमहा निश्चित उत्पन्न मिळवण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली जात आहे.

LIC Best Scheme: कामही मिळणार अन् कमाईही होणार! LIC च्या ‘या’ योजनेत महिलांना दरमहा मिळतात 7000 रुपये

LIC Best Scheme: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 'LIC विमा सखी' या विशेष आणि लोकप्रिय सरकारी योजनेची सुरुवात केली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवणे आणि गावागावांत विम्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत महिलांना स्वतःचे काम करत असतानाच दरमहा निश्चित उत्पन्न मिळवण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली जात आहे. या योजनेचा वाढता प्रतिसाद पाहता, यात सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे.

10 वी उत्तीर्ण महिलांसाठी संधी; मानधनासोबत प्रशिक्षणही मोफत
18 ते 70 वयोगटातील आणि किमान 10 वी उत्तीर्ण असलेल्या महिला 'LIC विमा सखी' योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होणाऱ्या महिलांना पहिल्या 3 वर्षांसाठी LIC कडून विशेष प्रशिक्षण आणि दरमहा निश्चित मानधन (स्टायपेंड) दिले जाते. 3 वर्षांचे हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर महिला अधिकृत LIC एजंट म्हणून आपले काम पुढे चालू ठेवू शकतात.

पहिल्या वर्षी दरमहा 7,000 रुपयांचे मानधन; जाणून घ्या कमाईची रचना
'LIC विमा सखी' योजनेअंतर्गत सहभागी महिलांना पहिल्या वर्षी दरमहा 7,000 रुपयांचे निश्चित मानधन मिळते. दुसऱ्या वर्षी हे मानधन दरमहा 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी दरमहा 5,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, पॉलिसी विक्रीवर मिळणाऱ्या कमिशनव्यतिरिक्त ज्या महिला ठरवून दिलेले विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करतात किंवा त्यापेक्षा जास्त काम करतात, त्यांना अतिरिक्त कमिशन आणि प्रोत्साहन भत्तेही दिले जातात.

अर्जासाठीच्या अटी आणि ऑनलाइन प्रक्रिया
या योजनेत ग्रामीण भागातील महिलांना विशेष प्राधान्य दिले जाते. मात्र, LIC चे विद्यमान एजंट आणि कर्मचाऱ्यांचे जवळचे नातेवाईक या योजनेसाठी अपात्र मानले जातील. याशिवाय, पहिल्या वर्षी विकलेल्या पॉलिसींपैकी किमान 65 टक्के पॉलिसी सक्रिय राहणे बंधनकारक आहे.

हेही वाचा – Government Scheme For Women : सरकारची आश्वासनपूर्ती! आता महिलांच्या खात्यात जमा होणार थेट 2500 रुपये; 1 ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू

'LIC विमा सखी' योजनेसाठी इच्छुक महिला एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जासोबत वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि 10 वी उत्तीर्ण असल्याचा शैक्षणिक पुरावा ही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number