Gaurav More : अखेर फिल्टरपाड्याच्या बच्चनला मिळाली बायको…; ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे अडकला लग्नबंधनात, फोटो व्हायरल

त्याच्या कोणत्याही चित्रपट किंवा कार्यक्रमामुळे नाही तर त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आला आहे.

Gaurav More : अखेर फिल्टरपाड्याच्या बच्चनला मिळाली बायको…; ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे अडकला लग्नबंधनात, फोटो व्हायरल

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे सध्या खूप चर्चेत आला आहे. त्याच्या कोणत्याही चित्रपट किंवा कार्यक्रमामुळे नाही तर त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आला आहे. 'फिल्टर पाड्याचा बच्चन ' गौरव मोरे हास्यजत्रेत कित्येकदा मुलीचा हात मागायला जातो, अन् रिजेक्ट होऊन परत येतो. पण, खऱ्या आयुष्यात गौरवने त्याची गर्लफ्रेंड प्रियंका कारेकर हिच्यासोबत लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. 

कुठलाही गाजावाजा न करता आपल्या गर्लफ्रेंडसोबत  लग्न केलं असून अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने शेअर केलेल्या फोटोमुळे गौरवने लग्नगाठ बांधल्याचं समोर आले आहे. 'Mr & Mrs मोरे ' असं कॅप्शनही तिने या फोटोवर टाकलं.

हेही वाचा – Bhoot Bangla Release Date: अक्षय कुमारवर 'धुरंधर'चा प्रभाव! 'भूत बंगला'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली, आता वापरणार ही रणनीती 

ऋतुजाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये गौरवची बायको साडी हातात चुडा, गळ्यात मंगळसूत्र अशा वेषात दिसतेय. गौरव तिच्या बाजूला उभा राहिलाय. ऋतुजाने या दोघांसोबत फोटो काढत तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमच्या या नवीन प्रवासासाठी आणि सुंदर नवीन घरासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन! 'करू' आणि 'बच्ची', गॉड ब्लेस यू."

हेही वाचा – Aditya Dhar Next Movie :'धुरंधर'च्या यशानंतर आदित्य धरचा मास्टर प्लॅन! रणवीर सिंहसोबत 'या' 3 बड्या चित्रपटांची चर्चा

दरम्यान, गौरव मोरेची पत्नी प्रियंकाही मनोरंजन विश्वातीलच असल्याचं  तिच्या सोशल मीडियावरून कळतंय. तिने काही नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. इतकच नाही तर अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि प्रियंका या खूप जुन्या आणि घट्ट मैत्रिणी आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number