Gaurav More: ताडपत्री ते फ्लॅट…, गौरव मोरेला मिळालं हक्काचं घर

महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे त्याच्या अभिनयामुळे घराघरात पोहोचला. आता त्याने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. गौरव मोरेला त्याच्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळाल्या आहेत.

Gaurav More: ताडपत्री ते फ्लॅट…, गौरव मोरेला मिळालं हक्काचं घर

Gaurav More: महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे त्याच्या अभिनयामुळे घराघरात पोहोचला. आता त्याने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. गौरव मोरेला त्याच्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळाल्या आहेत. आर्थिक परिस्थितीवर मात करत त्याने मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. यावेळी त्याने इंस्टाग्राम या समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे. 

गौरव मोरे याने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की, “फिल्टर पाडा ते पवई हा प्रवास बघताना खूप छोटा वाटतो, पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्ष लागली आहे. जिथे राहतो तिथेच आपल घर असावं हे कायम मनात होत. लहानपणापासून वाटत होतं, जिथे राहतो तिथेच घर घ्यायचं आणि आज ते स्वप्न खरया अर्थाने सत्यात उतरलं आणि काल दिनांक 25-9-2025 रोजी आम्हाला आमच्या पवईच्या नवीन घराचा ताबा मिळाला. ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे आणि काल घरच्यांना त्या घराचा आनंद घेताना बघून मन भरून आलं आणि वाटलं आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी केलं. माझी नाळ कायम फिल्टर पाडा आणि पवईसोबत जोडली गेली आहे आणि ती कधीच तुटणार नाही.” अशा आशयाची पोस्ट मोरेने केली आहे. 

 

हेही वाचा: Sameer Wankhede : समीर वानखेडेंना दिल्ली हायकोर्टात मोठा धक्का! आर्यन खानच्या वेब सीरिजविरोधात मानहानी प्रकरणाची सुनावणी.. कोर्ट म्हणाले,

या पोस्टमध्ये त्याने स्वप्न पूर्ण केल्याबद्दल म्हाडाचे देखील  मनापासून आभार मानले आहेत. गौरव मोरे याची ही भावूक पोस्ट वाचून अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. गौरव मोरेला मागील वर्षी म्हाडाच्या लॉटरीमध्ये पवईमध्ये घर मिळालं. त्या घराच्या चाव्या त्याला देण्यात आल्या. घराच्या चाव्या मिळताच गौरव मोरेचा आनंद गगनात मावेनाना झालाय. त्यामुळे त्याने ही पोस्ट लिहिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number