अमरावतीत संचारबंदीत आणखी शिथिलता

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे अमरावतीमधील तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. परंतु आता अमरावतीमधील संचारबंदीमध्ये पोलीस प्रशासनाकडून शिथिलता मिळाली आहे. मात्र सायंकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत अमरावतीत संचारबंदी कायम असणार आहे. […]

अमरावतीत संचारबंदीत आणखी शिथिलता

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे अमरावतीमधील तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. परंतु आता अमरावतीमधील संचारबंदीमध्ये पोलीस प्रशासनाकडून शिथिलता मिळाली आहे. मात्र सायंकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत अमरावतीत संचारबंदी कायम असणार आहे. अमरावतीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने आणि कृषी केंदे खुली करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाने दिली आहे.

  अमरावतीमध्ये सकाळी अकरा ते दुपारी पाच वाजेपर्यंत संपूर्ण कृषीकेंद्रे खुले करण्याची मुभा मिळाली असून शहरातील सर्व शासकीय कार्यालय व बँका पूर्ण वेळेत सुरू राहणार आहेत. तसेच आठवड्याभरानंतर बाजारपेठादेखील उघडणार  आहेत. दरम्यान शहरातील इंटरनेट सेवा मात्र बंदच राहणार आहे तर शासकीय कार्यालय आणि बँकेतील इंटरनेट सेवा सुरू राहणार आहे. अमरावतीमधील सकाळच्या संचारबंदीत शिथिलता करण्यात आली मात्र सायंकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे.

  अमरावतीमध्ये भाजपच्या बंदला हिंसक वळण लागले. तर बंददरम्यान अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. अमरावतीमध्ये जातीय तणाव चिघळला असून शिवसेनासुद्धा या बंदमध्ये सहभागी झाली. तसेच आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. याच पार्श्वभूमीवर शहरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number