Mann Ki Baat: कारगिल वीरांना अभिवादन ते विक्रम-1चे ऐतिहासिक उड्डाण… ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचा देशवासियांशी संवाद

आपल्या संबोधनाची सुरुवात करताना त्यांनी 26 जुलै या 'कारगिल विजय दिवसा'चे औचित्य साधून देशाचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांच्या धैर्याला व बलिदानाला आदराने प्रणाम केला.

Mann Ki Baat: कारगिल वीरांना अभिवादन ते विक्रम-1चे ऐतिहासिक उड्डाण… ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचा देशवासियांशी संवाद

Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमाच्या 136 व्या भागाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. आपल्या संबोधनाची सुरुवात करताना त्यांनी 26 जुलै या 'कारगिल विजय दिवसा'चे औचित्य साधून देशाचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांच्या धैर्याला व बलिदानाला आदराने प्रणाम केला. उंच पर्वत आणि प्रतिकूल हवामानासारख्या अत्यंत कठीण आव्हानांवर मात करत भारतमातेचे रक्षण करणाऱ्या हुतात्म्यांचे मनोबल प्रत्येक संकटापेक्षा मोठे होते, अशा शब्दांत त्यांनी सैनिकांचे कौतुक केले. यासोबतच, येत्या हरघर तिरंगा मोहिमेत सहभागी होत प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याचे आवाहनही त्यांनी देशवासियांना केले.

संरक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत झपाट्याने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्याचा वापर करून भारतातच तयार झालेली 'आयएनएस महेंद्रगिरी' ही आधुनिक युद्धनौका नुकतीच भारतीय नौदलात दाखल झाली आहे. याशिवाय 'पिनाका लाँग-रेंज गाइडेड रॉकेट' आणि 'कुशा' क्षेपणास्त्राची झालेली यशस्वी चाचणी ही डीआरडीओच्या (DRDO) शास्त्रज्ञांच्या सामूहिक परिश्रमाचे फळ आहे. भारताच्या संरक्षण साहित्यावरील जागतिक विश्वास वाढल्याचे सांगताना त्यांनी इंडोनेशियासोबत ब्रह्मोस व अस्त्र क्षेपणास्त्रांबाबत झालेल्या महत्त्वपूर्ण कराराचा विशेष उल्लेख केला.

जलसंवर्धनाच्या महत्त्वाला अधोरेखित करताना पंतप्रधानांनी 'कॅच द रेन' मोहिमेचा पुनरुच्चार केला. पावसाचे पाणी जिथे पडेल तिथे साठवणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपण यासाठी 4 जुलैपासून देशभरात विशेष मोहीम सुरू आहे. यामध्ये गावे, शहरे, पंचायती आणि सामाजिक संस्थांचा उत्साहवर्धक सहभाग दिसून येत आहे. भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी नागरिकांनी आपापल्या परिसरातील तळे, विहीर किंवा बारव दत्तक घेऊन पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

क्रीडा जगतात भारतीय खेळाडूंनी कमावलेल्या कौतुकास्पद यशाचा पंतप्रधानांनी गौरव केला. राष्ट्रकुल (Commonwealth) स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशातील युवा खेळाडूंचे मनोबल वाढवले. पी.व्ही. सिंधूने 'जपान Open' चे विजेतेपद पटकावून रचलेला इतिहास आणि भारतीय महिला क्रिकेट संघाने लंडनच्या लॉर्ड्स स्टेडियमवर मिळवलेला पहिला ऐतिहासिक कसोटी विजय या गोष्टी संपूर्ण देशाला अभिमानस्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच, केरळमधील दक्षिण चित्तूर येथील एका शाळेत 'अक्षरकंदुक' उपक्रमाद्वारे फुटबॉलच्या खेळाशी जोडून अनोख्या पद्धतीने संस्कृत भाषा शिकवणाऱ्या प्राध्यापक अभिलाष यांच्या प्रयत्नांचे त्यांनी भरभरून कौतुक केले.

हेही वाचा – CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांनंतर आता 'या' मंत्र्याचा राजीनामा घेऊन दाखवा! प्रसिद्ध अभिनेत्रीची खळबळजनक पोस्ट

अंतराळ आणि शिक्षण क्षेत्रात भारताची तरुणाई नव-नवीन शिखरे सर करत आहे. खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेल्या 'विक्रम-1' या पहिल्या रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाने भारताच्या अंतराळ इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. तरुणांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले केल्याचा सकारात्मक परिणाम आज दिसत असल्याचे मोदी म्हणाले. तसेच, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सर्व 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवून भारताला अव्वल स्थान मिळवून दिले आहे. यासोबतच रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित ऑलिम्पियाडमध्येही भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई करत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number