विजेच्या धक्क्याने चार जणांचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडामधल्या सरांडी येथील खेमराज साठवणे यांच्या घरगुती विहिरीतील मोटार पंप खराब झाला होता. विहिरीत उतरल्यानंतर सर्वात प्रथम त्यांना विजेचा धक्का लागला. त्यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेले सचिन भोंगाळे आणि प्रकाश भोंगाळे या काका पुतण्यासह महेंद्र राऊत याचा देखील विहीरीत उतरताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे सरांडी गावावर शोककळा पसरली असून परिसरात […]

विजेच्या धक्क्याने चार जणांचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडामधल्या सरांडी येथील खेमराज साठवणे यांच्या घरगुती विहिरीतील मोटार पंप खराब झाला होता. विहिरीत उतरल्यानंतर सर्वात प्रथम त्यांना विजेचा धक्का लागला. त्यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेले सचिन भोंगाळे आणि प्रकाश भोंगाळे या काका पुतण्यासह महेंद्र राऊत याचा देखील विहीरीत उतरताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे सरांडी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास प्रशासनाने सुरु केला आहे.

काय आहे नेमकी घटना?
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सरांडी या गावात गिरधारी साठवणे यांची स्वतःची घरी विहीर आहे. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, विहरीत पाणी भरत असल्यामुळे विहिरीतील विद्युत मोटार वर करण्यासाठी सचिन गिरधारी साठवणे हे विहिरीत उतरून मोटार बाजूला करीत असताना विजेच्या धक्क्याने ते विहिरीत पडले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे शेजारी सचिन पोंगडे आणि प्रकाश पाँगडे हे दोन्ही काका पुतणे आणि महेंद्र राऊत हे त्यांना वाचविण्यासाठी विहरीजवळ गेले असता ते तिघेही विजेच्या धक्क्याने विहिरीत पडल्याची घटना सरांडी या गावात घडली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number