जलयुक्त शिवार घोटाळ्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार घोटाळ्यात मागील महिन्यामध्ये कृषी विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आता पुन्हा परळी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. शिवाजी हजारे, विजयकुमार भताने, पांडुरंग जंगमे, अमोल कराड असे अटक कलेलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांपैकी शिवाजी हजारे आणि विजयकुमार भताने हे दोघेजण निवृत्त तालुका कृषी अधिकारी आहेत. तर कराड आणि जंगमे हे सध्या कृषी सहाय्यक म्हणून काम करत आहेत.