स्त्रियांना साड्या आणि दागिने सर्वात जास्त प्रिय गोष्ट असते, आणि स्त्रियांची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे पैठणी साडी आहे. पैठणी म्हंटले की येवला शहर जगप्रसिद्ध आहे. येवल्याचे पैठणी कारागीर नेहमीच आपली कला पैठणी साडीवर साकारत असतात. अशाच रोहित पैंजणे आणि प्रशांत पैंजणे या दोघा विणकर भावंडांनी पैठणी साडीवर शनिवार वाडा, प्रतापगड, असे गड-किल्ले साकारले आहेत. पैठणीवर हे सर्व नक्षी काम करण्याकरता या कारगिराला पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागला आहे.
पैठणी कारगिर नेहमीच विविध कला पैठणी साडीवर साकारत असतात. मात्र आपला इतिहास नागरिकांनी जपावा याकरता या भावंडांनी इतिहासा संदर्भात गड किल्ले पैठणी साडीवर विणकाम करून काढले असून यापुढे देखील विविध कला पैठणीवर साकारणार असल्याची माहिती या पैठणी विणकरांनी दिली आहे.
या भावंडाच्या आजोबांपासून पैठणी साडी बनवण्याचं काम करत आहेत आणि हे भावंड गेली १५ वर्ष पैठणी बनवण्याचं काम करत आहेत. पैठणी पुर्ण रेशीम धाग्यानी बनलेली आहे, त्यात रेशीम जर वापरली गेली आहे. आता या पैठणी साडीवर आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रूक्मीणी साकरण्यात येणार आहे असही या पैठणी कारागिराकडून सांगण्यात आलं आहे.
कसे साकारले पैठणीवर गड-किल्ले पाहुयात