Himachal Pradesh Flood : हिमाचाल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार! पुढील 24 तास महत्त्वाचे; हवामान विभागाचा 6 जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

शिमला : हिमाचल प्रदेशात पुढील 24 तासांत मुसळधार पावसामुळे अचानक पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्य हवामान केंद्राने सात जिल्ह्यांसाठी पुराचा इशारा जारी केला आहे. केंद्रानुसार, पुढील 24 तासांत शिमला, कुल्लू, कांगडा, मंडी, किन्नौर, चंबा आणि सिरमौर जिल्ह्यांमधील काही पाणलोट क्षेत्रे व लगतच्या भागांत अचानक पूर येण्याचा धोका कमी ते मध्यम स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे. इशारा लक्षात […]

Himachal Pradesh Flood : हिमाचाल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार! पुढील 24 तास महत्त्वाचे; हवामान विभागाचा 6 जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

शिमला : हिमाचल प्रदेशात पुढील 24 तासांत मुसळधार पावसामुळे अचानक पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्य हवामान केंद्राने सात जिल्ह्यांसाठी पुराचा इशारा जारी केला आहे. केंद्रानुसार, पुढील 24 तासांत शिमला, कुल्लू, कांगडा, मंडी, किन्नौर, चंबा आणि सिरमौर जिल्ह्यांमधील काही पाणलोट क्षेत्रे व लगतच्या भागांत अचानक पूर येण्याचा धोका कमी ते मध्यम स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे. इशारा लक्षात घेता, लोकांना धोकादायक भागांत आणि जलाशयांच्या जवळ जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा : Maharashtra Rain: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा कहर! 3 जिल्ह्यांना ऑरेंज, 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

केंद्र सरकारने राज्यातील सर्व 12 जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज' आणि 'येलो' अलर्ट जारी केले आहेत. कुल्लू, कांगडा, मंडी, बिलासपूर, चंबा आणि सिरमौर या जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला असून, तिथे दिवसभरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शिमला, सोलन, हमीरपूर, उना, किन्नौर तसेच लाहौल आणि स्पिती या जिल्ह्यांसाठी 'येलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number