CPP Portal: आधी CBSE ला नमवलं, आता सरकारच्या 1.66 कोटी सरकारी नोंदी केल्या सार्वजनिक; 12 वीच्या सार्थक सिद्धांतचा मोठा कारनामा

सार्थक सिद्धांत या विद्यार्थ्याने सरकारी खरेदीशी संबंधित कागदपत्रे सामान्य जनतेला सहज उपलब्ध करून देण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

CPP Portal: आधी CBSE ला नमवलं, आता सरकारच्या 1.66 कोटी सरकारी नोंदी केल्या सार्वजनिक; 12 वीच्या सार्थक सिद्धांतचा मोठा कारनामा

CPP Portal: रांची येथील 'जेव्हीएम श्यामली' (JVM Shyamali) शाळेत इयत्ता 12 वी मध्ये शिकणाऱ्या सार्थक सिद्धांत या विद्यार्थ्याने सरकारी खरेदीशी संबंधित कागदपत्रे सामान्य जनतेला सहज उपलब्ध करून देण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या 'सेंट्रल पब्लिक प्रोक्योरमेंट' (CPP) पोर्टलवरून सरकारी खरेदीच्या तब्बल 1.66 कोटी नोंदी संकलित करून त्याने एक ऑनलाइन डेटाबेस आणि नवीन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलमुळे आता कोणताही नागरिक, पत्रकार किंवा संशोधक अवघ्या काही क्लिक्समध्ये या सर्व नोंदी अगदी सहजपणे पाहू शकतो.

पारदर्शकता वाढवण्यासाठी उचलले पाऊल
सार्थकच्या मते, सरकारी नोंदींवर वास्तविक पाहता जनतेचाच हधिकार असतो. परंतु, सध्याच्या शासकीय प्रणालीमध्ये या नोंदी शोधणे आणि त्या डाउनलोड करणे अत्यंत क्लिष्ट व कठीण काम आहे. हीच गुंतागुंत दूर करून माहिती मिळवणे सोपे व्हावे, यासाठी त्याने हे पोर्टल तयार केले आहे. माहितीची उपलब्धता जितकी सहज असेल, तितकीच व्यवस्थेतील पारदर्शकता अधिक मजबूत होते, असा विश्वास त्याने व्यक्त केला. गेल्या 2 आठवड्यांत रात्रं-दिवस मेहनत करून त्याने सीपीपी (CPP) पोर्टलवरून या 1.66 कोटी नोंदी गोळा केल्या आणि त्या एका सार्वजनिक डेटाबेसमध्ये पद्धतशीरपणे मांडल्या.

वेळेची बचत आणि संशोधकांना मोठा फायदा
अधिकृत सरकारी संकेतस्थळांवर माहिती शोधण्यात आणि ती डाउनलोड करण्यात नागरिकांचा खूप वेळ वाया जातो. मात्र, सार्थकने तयार केलेल्या प्लॅटफॉर्ममुळे ही वेळखाऊ प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे. आता कोणीही ही कागदपत्रे थेट डाउनलोड करून सरकारी खरेदीशी संबंधित निर्णयांचे स्वतंत्रपणे विश्लेषण करू शकते. यामुळे संशोधक, प्रसारमाध्यमे आणि सामान्य नागरिकांच्या वेळेची मोठी बचत होणार असून खरेदी प्रक्रिया समजून घेणे सोपे होणार आहे.

सीबीएसई (CBSE) प्रणालीतील त्रुटी केल्या होत्या उघड
सार्थक सिद्धांत अशा प्रकारे प्रकाशझोतात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्याने 'सीबीएसई'च्या 'ऑन-स्क्रीन मार्किंग' (OSM) प्रणालीतील आणि इयत्ता 12th च्या उत्तरपत्रिकांच्या डिजिटल मूल्यमापनातील त्रुटी उघड केल्या होत्या. स्वतःच्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकेत गुणांची तफावत आढळल्यानंतर, त्याने संपूर्ण डिजिटल मूल्यमापन प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला होता. त्याच्या या धाडसी उपक्रमाची शिक्षण क्षेत्रात खूप मोठी दखल घेतली गेली होती.

हेही वाचा – Theft at Giribala Singh House: मोठी बातमी! ट्विशा शर्मा प्रकरणातील आरोपी माजी न्यायाधीश गिरीबाला यांच्या घरी चोरी

भविष्यातील योजना आणि मुख्य उद्देश
सरकारी खर्चाशी संबंधित नोंदी सर्वांसाठी खुल्या करून सरकारी खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे, हाच सार्थकच्या या नवीन उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. माहिती सहज उपलब्ध असल्यास लोक त्याचा अधिक अभ्यास करतील, ज्यामुळे केवळ संशोधनाला गती मिळणार नाही तर जनतेचे देखरेख कार्यही मजबूत होईल, असे तो म्हणतो. या प्रकल्पात भविष्यात आणखी सुधारणा करण्याचा सार्थकचा मानस असून, यासाठी तो अभियंत्यांच्या एका टीमसोबत काम करत आहे. पोर्टलमध्ये नवनवीन फीचर्स समाविष्ट करून अधिकाधिक नोंदी जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा त्याचा संकल्प आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number