बँक घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत 70 लोकांवर गुन्हे दाखल

महाराष्ट्र राज्य सहकारी घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत 70 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. 420, 506 409 465, 467 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला हे आदेश देण्यात आले होते. नेमकं प्रकरण काय? न्यायालयानं आर्थिक गुन्हे शाखेला पाच दिवसात […]

बँक घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत 70 लोकांवर गुन्हे दाखल

महाराष्ट्र राज्य सहकारी घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत 70 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. 420, 506 409 465, 467 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला हे आदेश देण्यात आले होते.

नेमकं प्रकरण काय?

न्यायालयानं आर्थिक गुन्हे शाखेला पाच दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या घोटाळ्यात 2007 ते 2011 दरम्यान आरोपींच्या मदतीने बँकेला 1000 कोटी रुपयांनी नुकसान पोहचवल्याचा आरोप करण्यात आला होता.

आरोपींमध्ये 34 जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकाऱ्याचा, आणि संचालकांचा समावेश आहे. बँकेला झालेलं नुकसान हे साखर कारखाने आणि सूतगिरण्या ना दिलेल्या अनिर्बंध कर्जामुळे आणि त्याच्या वसुलीमध्ये कमालीची अनियमितता ठेवल्याने झाली आहे.

मुंबईच्या रमाबाई आंबेडर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन सभासद आणि संचालकांविरुध्द गुन्हे नोंदवण्यात आला आहे. तत्कालीन संचालकामध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ
आनंदराव अडसूळसह अनेकांचा समावेश होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number