अखेर शाळेचे दार विद्यार्थ्यांसाठी खुले

आजपासून येवला शहरासह ग्रामीण भागातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. गेल्या २० महिन्यानंतर  बंद असलेल्या शाळा आता पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली. तसेच दुसरीकडे विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग होणार नाही यादृष्टीने शाळेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये २१ दिवसांनंतर शाळा सुरू २१ महिन्यांनंतर आजपासून नाशिकमध्ये पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा […]

अखेर शाळेचे दार विद्यार्थ्यांसाठी खुले

आजपासून येवला शहरासह ग्रामीण भागातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. गेल्या २० महिन्यानंतर  बंद असलेल्या शाळा आता पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली. तसेच दुसरीकडे विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग होणार नाही यादृष्टीने शाळेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत.

नाशिकमध्ये २१ दिवसांनंतर शाळा सुरू

२१ महिन्यांनंतर आजपासून नाशिकमध्ये पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेपासूनच राज्यात शाळांना टाळे लागले होते. त्यानंतर आजपासून या शाळा पुन्हा एकदा गजबजल्या आहेत.

आजपासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्येदेखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांचे तापमान आणि ऑक्सिजन तपासूनच प्रवेश दिला जात आहे. फुल आणि चॉकलेट देऊन शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आज पहिल्या दिवशी स्वागत केले.

नांदेडमध्ये शाळा सुरू

नांदेड जिल्ह्यातही जवळपास २० महिन्यांच्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार होत्या मात्र, राज्यात ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव झाल्याने खबरदारी म्हणून शाळा बाबतचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र आता आजपासून शहरी भागात पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोनाचे संपुर्ण नियम पाळून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number