अखेर परिणीतीने सोडलं मौन

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून परिणीती खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत दिसल्याने बऱ्याच चर्च्यांना उधाण आले आहे.अलीकडेच त्या दोघांना एकत्र हॉलेटबाहेर स्पॉट केल्यानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे रिलेशनशिपमध्ये असलेल्या चर्चा रंगू लागल्या आहेत.अशातच या चर्चांवरील मौन तोडत आता परिणीतीने राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा […]

अखेर परिणीतीने सोडलं मौन

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून परिणीती खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत दिसल्याने बऱ्याच चर्च्यांना उधाण आले आहे.अलीकडेच त्या दोघांना एकत्र हॉलेटबाहेर स्पॉट केल्यानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे रिलेशनशिपमध्ये असलेल्या चर्चा रंगू लागल्या आहेत.अशातच या चर्चांवरील मौन तोडत आता परिणीतीने राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर परिणीतीने पहिल्यांदाच भाष्य केले आहे.ती म्ह्णणाली ,”माध्यमांमध्ये सध्या माझ्याबद्दल बऱ्याच चर्चा रंगत आहेत. पण कधी-कधी एखाद्याच्या खासगी आयुष्यावर बोलताना सुद्धा काही मर्यादा असतात. जेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा त्यामध्ये एक ओढणं गरजेचं असत.आता याला तुम्ही समजा किंवा काहीही! चर्चा करणं आणि आपमान करणं यामध्ये एक लहान रेखा आहे. ‘एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण मला द्यायचं नसेल तर मी देणार नाही.”

हे भाष्य करतांना तिने कुठेही राघव यांचं नाव घेतलं नाही परंतू आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यानंतर चर्चा अधिक जोर धरू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती – राघव हे दोघे एकाच कॉलेजमध्ये होते तरीही, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकतीच झाली आहे.पंजाब मध्ये शूटिंग करत असताना परिणीती राघव ला भेटली आणि त्यांचं प्रेम बहरू लागलं असं सांगण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number