Sunny Leone Photo in Farm : नाद करायचा नाय…! शेतकऱ्याने चक्क शेतातच लावला सनी लिओनीचा फोटो, कारण ऐकून व्हाल हैराण

मुदानूर गावातील या शेतकऱ्याने शेताच्या कडेला बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा आकर्षक फोटो असलेले मोठे पोस्टर लावले आहे.

Sunny Leone Photo in Farm : नाद करायचा नाय…! शेतकऱ्याने चक्क शेतातच लावला सनी लिओनीचा फोटो, कारण ऐकून व्हाल हैराण

Sunny Leone Photo in Farm : कर्नाटकातील यादगिर जिल्ह्यात एक आगळावेगळा प्रकार घडला असून, एका शेतकऱ्याने आपल्या कापसाच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत अनोखा मार्ग अवलंबला आहे. मुदानूर गावातील या शेतकऱ्याने शेताच्या कडेला बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा आकर्षक फोटो असलेले मोठे पोस्टर लावले आहे. त्याची ही कल्पकता सध्या सोशल मीडियासह परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

पिकाला ‘नजर’ लागू नये म्हणून सनी लिओनीचा फोटो

शेतकऱ्याचे म्हणणे आहे की, रस्त्याने जाणारे लोक पिकाचे कौतुक करताना कधी कधी अनवधानाने ‘नजर’ लावतात. त्यामुळे पिकाची वाढ प्रभावित होते असा त्याचा समज आहे. हे टाळण्यासाठी लोकांचे लक्ष पिकावर न जाता पोस्टरकडे जावे, यासाठी त्याने हा उपाय केला. सनी लिओनीच्या पोस्टरकडे लोकांचे लक्ष वेधले गेले की पिकाकडे लक्ष जाणार नाही, असा त्याचा दावा आहे. 

हेही वाचा – Post on Delhi Pollution : 'काहीही करा.. पण मुंबई-दिल्ली सोडा,' लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय तरुणाची पोस्ट; म्हणतो, 'मी दिल्लीचाच आहे.. पण आता..'

शेतकऱ्यांच्या मते, पिकांचे रक्षण करण्यासाठी बुजगावणे उभे करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. मात्र या शेतकऱ्याचा हा वेगळाच प्रयोग पाहून त्याच्या आसपासच्या शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. काही जण हा उपाय मनोरंजक मानत असले तरी अनेक जण त्याला केवळ विनोदी कृत्य म्हणून पाहत आहेत.

हेही वाचा – Kerala Couple Emotional Moment: वधूच्या अपघातानंतर नवरदेवाने रुग्णालयातच बांधली लग्नगाठ; हृदयस्पर्शी क्षण पाहून नेटीझन्सला आली विवाह चित्रपटाची आठवण

दरम्यान, सनी लिओनी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आणि पूर्वीची प्रौढ चित्रपट कलाकार म्हणून जगभर ओळखली जाते. तिचे खरे नाव करनजीत कौर वोहरा आहे. भारतातील बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमुळे तिला बॉलिवूडमध्ये नवे दार खुले झाले. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number