शाहरुख खानवर चाहते संतापले

मुंबई, 4 मे २०२३, प्रतिनिधी :बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो.शाहरूख खान गेली 30 वर्ष बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे, टेलिव्हिजनपासून सुरूवात करत हळूहळू चित्रपटांमध्ये नाव कमावू लागलेला हा अभिनेता सुपरस्टार झाला. 2 नोव्हेंबरला त्याच्या वाढदिवशी ‘मन्नत’वर हजारो चाहत्यांची रांग लागलेली असते तसेच शाहरूख खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर […]

शाहरुख खानवर चाहते संतापले

मुंबई, 4 मे २०२३, प्रतिनिधी :बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो.शाहरूख खान गेली 30 वर्ष बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे, टेलिव्हिजनपासून सुरूवात करत हळूहळू चित्रपटांमध्ये नाव कमावू लागलेला हा अभिनेता सुपरस्टार झाला. 2 नोव्हेंबरला त्याच्या वाढदिवशी ‘मन्नत’वर हजारो चाहत्यांची रांग लागलेली असते तसेच शाहरूख खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर असतात.शाहरुख केवळ भारतातच नाहीतर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये त्याचे चाहते आहेत.

त्यामुळे किंग खानसोबत एक सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची ओसंडून वाहणारी गर्दी अनेकांना माहिती आहे.अशातच विमानतळावर शाहरुखच्या चाहत्यानं त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला होता.मात्र शा हरुख ने त्याला रागाच्या भरात त्याला ढकलले. हा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर बराच व्हयरल होत असून चाहते शाहरुख खानवर राग व्यक्त करत आहे. तू आमच्या मूळे पुढे गेलास,जास्त रुबाब दाखवू नकोस, तुला चाहत्यांसोबत कसं वागायचं हे कळत नाही का ?, तुला एवढा राग कसला ? असे प्रश्न विचारत चाहत्यांनी त्याला खडेबोल सुनावले.

तर शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. पठाण चित्रपट हिट झाल्यामुळे त्याला रुबाब आला अशा अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या शाहरुख सध्या आगामी ‘जवान’ आणि ‘डंकी’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नुकताच तो ‘जवान’चे काश्मीर शेड्यूल संपवून परतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number