सईच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

मुंबई,२८ एप्रिल २०२३,प्रतिनिधी : सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.आज बॉलीवूडमध्येही सई ताम्हणकरच्या नावाचा हळहळू का होईना दबदबा निर्माण होतोय.सई नेहमीच मोहक,बोल्ड, पारंपरिक असे सगळे लुक दमदारपणे कॅरी करताना दिसते.नुकतेच सई ताम्हणकरने समाज माध्यमांवर काळ्या रंगाच्या गाऊनमधील काही सुंदर छायाचित्रण सामायिक केले आहेत. सई ताम्हणकरनं हा लुक फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी केला […]

सईच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

मुंबई,२८ एप्रिल २०२३,प्रतिनिधी : सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.आज बॉलीवूडमध्येही सई ताम्हणकरच्या नावाचा हळहळू का होईना दबदबा निर्माण होतोय.सई नेहमीच मोहक,बोल्ड, पारंपरिक असे सगळे लुक दमदारपणे कॅरी करताना दिसते.नुकतेच सई ताम्हणकरने समाज माध्यमांवर काळ्या रंगाच्या गाऊनमधील काही सुंदर छायाचित्रण सामायिक केले आहेत.

सई ताम्हणकरनं हा लुक फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी केला आहे.काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये वेगवेगळ्या अदाकारी सई ताम्हणकर देताना दिसत आहे.सईच्या छाया चित्रणावर कमेंटचा वर्षाव सुरू आहे. पण एका चाहत्याची कमेंटने सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.सई मूळची सांगलीची असल्यामुळे चाहत्याने सांगलीची जेनिफर लॉरेन्स’ ..असं म्हणत भन्नाट कमेंट केलेली पाहायला मिळतेय. त्याच सोबत अनेक चाहत्यांनी तिच्या लूकच भरभरून कौतुक केलं आहे.

View this post on Instagram
A post shared by Sai (@saietamhankar)

अवॉर्डमधील सईच्या काळ्या रंगाच्या पोशाखाचं अनेकांनी कौतुकही केलं होतं. सईचा अनोख अंदाज या फोटोत पाहायला मिळाला होता.सई ताम्हणकर इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर नेहमी चर्चेत राहत असून अनेकदा तिला तिच्या छाया चित्रणावर ट्रॉल केलं जातं आणि सई ट्रॉलर्सना सडेतोड उत्तर देखील देते. तर सई गेल्या काही महिन्यांपासून ट्विटरवर चर्चेत नव्हती. पण आता ती ट्विटरवरही चर्चेत झाली आहे. त्यावेळी तिने रोखठोक ट्विट करत ट्रोलर्सना इशाराच दिला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number