दहावी, बारावीची बनावट प्रमाणपत्र उघड

पुणे, ९ मे २०२३, प्रतिनिधी : पुण्यात बनावट प्रमाणपत्राचा घोटाळा उघड झाला आहे. बनावट संकेतस्थळावरून ७००हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी हा छत्रपती संभाजीनगरचे आहे. टीईटीनंतरचा सर्वात मोठा घोटाळा राज्यात घडला आहे. पुण्यात बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा घोटाळा […]

दहावी, बारावीची बनावट प्रमाणपत्र उघड

पुणे, ९ मे २०२३, प्रतिनिधी : पुण्यात बनावट प्रमाणपत्राचा घोटाळा उघड झाला आहे. बनावट संकेतस्थळावरून ७००हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी हा छत्रपती संभाजीनगरचे आहे.

टीईटीनंतरचा सर्वात मोठा घोटाळा राज्यात घडला आहे. पुण्यात बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा घोटाळा उघड केला आहे. दहावी आणि बारावीच्या नापास विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र देत पास करण्यात आले आहे. महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल या बनावट संकेतस्थळावरून ७०० विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणाची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला कळताच, त्यांनी धडक कारवाई केली. बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पुणे पोलिसांनी तीघांना अटक केली आहे. कृष्णा सोनाजी गिरी (छत्रपती संभाजीनंगर), अल्ताफ शेख (धाराशिव) आणि सय्यद इमरान सय्यद इब्राहिम (छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली आहे.

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र इनविणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या टोळीने महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलसारखी बनावट वेबसाइटद्वारे तब्बल ७०० जणांना दहावी आणि बारावी उत्तीर्ण असल्याची बनावट प्रमाणपत्रे देल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे तपासाप्रकरणी पोलिसांनी बनावट ग्राहक बनून संदीप ज्ञानदेव कांबळे  ( रा.सांगली) याच्याशी संपर्क केला. कांबळे याने दहावी उत्तीर्णच्या प्रमाणपत्राला ६० हजार रुपये लागतील असे सांगितले. बनावट  ग्राहकाने ३९ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर उरलेले १६ हजार रुपये  घेण्यासाठी संदीप कांबळे स्वारगेटला आला असता पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number