फडणवीस आशिष देशमुख यांच्या भेटीला

देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र त्यापूर्वी ते देशमुखांच्या घरी पोहोचले. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत. आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निलंबित काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या घरी गेले होते. काँग्रेसमधून निलंबित असलेल्या आशिष देशमुख यांची शनिवारी (दि. […]

फडणवीस आशिष देशमुख यांच्या भेटीला

देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र त्यापूर्वी ते देशमुखांच्या घरी पोहोचले. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत. आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निलंबित काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या घरी गेले होते.

काँग्रेसमधून निलंबित असलेल्या आशिष देशमुख यांची शनिवारी (दि. २० मे) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. एक तास चाललेल्या या भेटीनंतर फडणवीस आणि बावनकुळे काहीही बोलले नसले तरी आशिष देशमुख यांनी ही सदिच्छा भेट होती, फडणवीस हे विदर्भाचा विकास घडवणारे एकमेव नेते आहेत आणि पक्ष विरहित संस्कृतीच्या नात्याने ते माझ्याकडे आले होते अशी प्रतिक्रिया दिली. मात्र देवेंद्र फडणवीस हे आशिष देशमुख यांच्या भेटीसाठी पोहोचल्यानंतर देशमुख भाजपच्या वाटेवर आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number