फडणवीसांचा दावा हास्यास्पद – राष्ट्रवादी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे अंगुलीनिर्देश करत केलेले वक्तव्य हास्यास्पद आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. ‘महाविकास आघाडीच्या काळात माझ्यावर गुन्हा दाखल होऊन मी तुरुंगात गेलो पाहिजे म्हणून अनेकांनी खूप प्रयत्न केले आहेत’, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, ‘मविआकाळात मला तुरुंगात टाकायचा आदेश वरून आला होता’, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी […]

फडणवीसांचा दावा हास्यास्पद – राष्ट्रवादी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे अंगुलीनिर्देश करत केलेले वक्तव्य हास्यास्पद आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

‘महाविकास आघाडीच्या काळात माझ्यावर गुन्हा दाखल होऊन मी तुरुंगात गेलो पाहिजे म्हणून अनेकांनी खूप प्रयत्न केले आहेत’, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, ‘मविआकाळात मला तुरुंगात टाकायचा आदेश वरून आला होता’, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

‘फडणवीसांचा दावा हास्यास्पद आहे, त्यांची प्रतिक्रिया पाहताच आमच्या पक्षात हशा उठला’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रमुख प्रवक्ते महेश तपासे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

‘सुडाचे राजकारण करणे ही भाजपची भूमिका आहे, असे वक्तव्यही महेश तपासे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना केले. तसेच, फडणवीसांच्या दाव्याप्रमाणे कोणताच आदेश राष्ट्रवादीने दिलेला नाही कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कायद्याला धरून, समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण करतात, असेही तपासे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

 

 

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number