फुटीरतावादी नेता यासिन मलिकला काही वेळातच शिक्षा सुनावण्यात येणार आहे. एनआयएने यासिन मलिकला यापूर्वीच दोषी ठरवले होते. दरम्यान, यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाला विनंती केली आहे. यासिन मलिकवर काश्मीरमधील दहशतवादी घटनांना पाकिस्तानी पाठिंब्याने निधी पुरवणे आणि दहशतवाद्यांना विध्वंसाचे सामान पुरविण्याचे आरोप करण्यात आले आहेत. थोड्याच वेळात, मलिकला शिक्षा सुनावली जाणार आहे.
यासिन मलिकला शिक्षा सुनावण्यापूर्वी पतियाळा न्यायालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर श्रीनगरमधील अनेक बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. लाल चौकासह अनेक भागात पोलीस तैनात करण्यात आला आहे.
यासिन मलिकवर गुन्हेगारी कट, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, काश्मिरमध्ये शांतता भंग करणे यासह बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्याच्या कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले आहेत. १९ मे रोजी न्यायालयाने यासिन मलिकला दोषी ठरवले आहे. दरम्यान, यासिन मलिकने हे आरोप न्यायालयामोर मान्य केले आहेत.
काश्मीर मधला फुटीरतावादी अतिरेकी.
यासिनकडून १९८४ साली ‘ताला पार्टी’ची स्थापना.
मकबूल भटच्या फाशीला विरोध केल्याने यासिनला अटकेत.
तुरुंगातून सुटल्यावर ताला पार्टीचे इस्लामिक स्टुडन्ट लीग असे नामांतर.
१९८७ – मुस्लिम युनाइटेड फ्रंटच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांचा प्रचार.