Ex RBI Governor Shaktikanta Das: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना निवृत्तीनंतर अवघ्या दोन महिन्यांतच मोठी जबाबदारी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-2 म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त झालेले शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात संपेल. त्यांच्या नियुक्तीबाबत जारी केलेल्या आदेशात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. शक्तिकांत दास यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. तसेच अर्थव्यवस्थेला दिशा देण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यांनी यापूर्वी अर्थ मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या नवीन नियुक्तीमुळे प्रशासकीय निर्णयांना बळकटी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा – पीएम इंटर्नशिपसाठी पुन्हा अर्ज सुरू! दरमहा मिळणार 5 हजार रुपये
दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2024 रोजी संपला. 6 वर्षे आरबीआय गव्हर्नर म्हणून काम केल्यानंतर, शक्तीकांत दास डिसेंबर 2024 मध्ये निवृत्त झाले. डिसेंबर 2018 मध्ये शक्तीकांत दास यांची आरबीआयचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2024 रोजी संपला. त्यानंतर संजय मल्होत्रा यांना आरबीआयचे गव्हर्नर बनवण्यात आले आहे.
शक्तिकांत दास हे 1980 च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. आरबीआय गव्हर्नरसोबत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मे 2017 पर्यंत, शक्तिकांत दास हे आर्थिक व्यवहार सचिव होते. यापूर्वी, शक्तिकांत दास यांनी 15 व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून काम केले.
शक्तीकांत दास यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. शक्तिकांत दास यांनी ब्रिक्स, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि सार्कमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून भाग घेतला. नोव्हेंबर 2016 मध्ये जेव्हा भारतात नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला तेव्हा शक्तीकांत दास हे आरबीआयचे गव्हर्नर होते.