Ethiopia Volcano: इथिओपियामधील ज्वालामुखी उद्रेकाचा भारतावर परिणाम; DGCA ने दिले कडक निर्देश

इथिओपियातील Hayli Gubbi ज्वालामुखी उद्रेकानंतर राखेचे ढग रेड सी ओलांडून दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. DGCA ने विमान कंपन्यांना उड्डाण मार्ग बदलण्याचे आणि इंजिन सुरक्षिततेची तपासणी करण्याचे निर्देश आहेत.

Ethiopia Volcano: इथिओपियामधील ज्वालामुखी उद्रेकाचा भारतावर परिणाम; DGCA ने दिले कडक निर्देश

इथिओपियातील Hayli Gubbi हा दीर्घकाळ शांत असलेला ज्वालामुखी अचानक सक्रिय झाला आणि रविवारी मोठ्या प्रमाणात राखेचे ढग वातावरणात सोडले. हे राखेचे ढग रेड सी (Red Sea) ओलांडत येमन आणि ओमानकडे सरकत अखेर सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत दिल्ली (Delhi) पर्यंत पोहोचले. हवामान तज्ज्ञांच्या मते हे ढग पुढे पंजाब (Punjab) आणि हरियाणा (Haryana) दिशेने सरकणार आहे.

या परिस्थितीमुळे भारताच्या Directorate General of Civil Aviation (DGCA) ने सर्व विमान कंपन्यांना तातडीची सल्ला सूचना दिली आहे. ज्वालामुखीच्या राखेचा सामना टाळण्यासाठी उड्डाणांचे मार्ग बदलणे, सुरक्षित उड्डाण उंची निवडणे आणि इंधन नियोजनावर विशेष भर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमान कंपन्यांनी इंजिनमध्ये अडथळा, धूर किंवा कोणताही राखेसंबंधित संशयास्पद अनुभव त्वरित कळवण्याचे निर्देश दिले आहेत. विमानतळांवरही सावधगिरी वाढवण्यात आली आहे. जर राखेचा परिणाम धावपट्ट्या किंवा टॅक्सीवेवर झाला तर त्यांची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश DGCA ने दिले. यामुळे काही उड्डाणे विलंबाने किंवा बदललेल्या मार्गाने चालवावी लागत आहेत.

हेही वाचा: Ayodhya Ram Mandir: पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यामुळे बदलले राममंदिर दर्शनाचे वेळापत्रक; वाचा महत्त्वाची माहिती

मुंबई (Mumbai) विमानतळातील एका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही उड्डाणे पाकिस्तान (Pakistan) च्या एअरस्पेसकडे वळवावी लागत आहेत. मात्र पाकिस्तानने भारतीय विमानकंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे भारतीय उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून आकडेवारी जमा केली जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते राखेचा ढग गुजरात (Gujarat), राजस्थान (Rajasthan), उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), दिल्ली (Delhi), हरियाणा (Haryana) आणि पंजाब (Punjab) या भागांवरून जाणार आहे.

हे ढग उत्तर भारतात 100 ते 120 किमी प्रती तास (km/h) वेगाने प्रवास करत असून 15,000 ते 25,000 फूट उंचीवर आहे. काही ठिकाणी त्याची उंची 45,000 ft पर्यंतही जाऊ शकते. या ढगात volcanic ash, sulphur dioxide आणि सूक्ष्म काच खडक कण असल्याने आकाश काही भागांत फिकट किंवा काळसर दिसू शकते. हवाई वाहतुकीवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. तथापि, तज्ज्ञांनी सांगितले की भारतीय शहरांच्या AQI वर या ढगाचा फारसा नकारात्मक परिणाम होणार नाही. एकूणच, इथिओपियातील ज्वालामुखी उद्रेकाचा भारताच्या हवाई वाहतुकीवर तात्पुरता परिणाम दिसत आहे. हवामान विभाग आणि विमान प्राधिकरणे परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक ते बदल उड्डाण मार्गांमध्ये करत आहेत.

हेही वाचा: Muskan Rastogi: पतीच्या वाढदिवशीच मुस्कानने दिला मुलीला जन्म; पतीचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये सापडल्यानंतर उडाली होती देशभरात खळबळ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number