कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठीचे PF वरील व्याज (Interest) सदस्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सदस्यांना EPFO कडून SMS येत असून त्यामध्ये त्यांच्या PF खात्यात व्याज जमा झाल्याची माहिती देण्यात येत आहे.
EPFO कडून येत आहेत SMS
गेल्या चार ते पाच दिवसांपासून अनेक EPFO सदस्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश येत आहेत. या संदेशामध्ये आर्थिक वर्ष 2025-26 चे व्याज PF खात्यात जमा करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही संदेशांमध्ये 31 मार्च ही व्याज जमा करण्याची तारीखही नमूद करण्यात आली आहे. जर तुम्हालाही असा संदेश आला असेल, तर तुमच्या PF खात्यातील शिल्लक तपासून त्याची खात्री करून घेऊ शकता.
PF बॅलन्स कसा तपासाल?
PF खात्यात व्याज जमा झाले आहे की नाही, हे तपासण्यासाठी EPFO ने सदस्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
1. EPFO पोर्टलद्वारे
सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Member Passbook या पर्यायावर लॉगिन करा. त्यानंतर UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा भरून लॉगिन करा. OTP पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचा PF खाते क्रमांक निवडून पासबुक आणि व्याजाची माहिती पाहू शकता.
2. मिस्ड कॉलद्वारे
EPFO सदस्य त्यांच्या UAN शी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊनही PF बॅलन्स तपासू शकतात. काही क्षणांतच SMS द्वारे खात्याची माहिती मिळते.
3. SMS सेवेद्वारे
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून EPFOHO UAN ENG असा संदेश टाइप करून 7738299899 या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर EPFO कडून SMS द्वारे PF बॅलन्स आणि शेवटच्या योगदानाची माहिती मिळेल.