गुरुपौर्णिमेचा सर्वत्र उत्साह

साईबाबांच्या शिर्डी मध्ये तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाची मोठ्या धूम धडाक्यात सुरुवात झाली आहे. साईबाबांना आपले गुरु मानणारे लाखो भक्त शिर्डीमध्ये साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहे. साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रत्येक भक्त स्वतःला धन्य मानत आहे. गुरुपौर्णिमाला व्यास पौर्णिमा पण म्हंटले जाते.सन १९०८ साली साईबाबाबांच्या अनुमतिने या गुरुपौर्णिमा उत्सवला सुरुवात झाली. साईबाबांचे परमभक्त […]

गुरुपौर्णिमेचा सर्वत्र उत्साह

साईबाबांच्या शिर्डी मध्ये तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाची मोठ्या धूम धडाक्यात सुरुवात झाली आहे. साईबाबांना आपले गुरु मानणारे लाखो भक्त शिर्डीमध्ये साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहे. साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रत्येक भक्त स्वतःला धन्य मानत आहे. गुरुपौर्णिमाला व्यास पौर्णिमा पण म्हंटले जाते.सन १९०८ साली साईबाबाबांच्या अनुमतिने या गुरुपौर्णिमा उत्सवला सुरुवात झाली. साईबाबांचे परमभक्त तात्यासाहेब नूलकर, तात्या कोते पाटील आणि काही भक्तांनी व्यास पौर्णिमेच्या दिवशी साईबाबांना आपले गुरु मानून पूजा केली आणि त्यावेळी पासून शिर्डीमध्ये व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या उत्सवला सुरुवात झाली.

पनवेल, नवी मुंबई परिसरासह सर्वदूर ख्याती असलेल्या पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. गेली ३५-४० वर्षे अनेक धार्मिक सोहळ्याचे आयोजन याठिकाणी करण्यात येते. दत्तजयंती, स्वामी समर्थ प्रकटदिन, गुरुपौर्णिमा यासह विविध धार्मिक सोहळ्याचे याठिकाणी आयोजन करण्यात येतात. गेली २ वर्षे कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येत होता. मात्र यंदा कोरोनाचे सावट टळल्याने गुरुपौर्णिमेनिमित्त पनवेल, नवी मुंबई सह परिसरातील असंख्य स्वामीभक्त याठिकाणी दर्शनासाठी येत आहेत. सकाळी ५ वाजता काकड आरतीने या सोहळ्याला सुरुवात झाली असून त्यानंतर नैमितीक पूजा, लघुरुद्र अभिषेक, गुरूपाद्यपूजन, दत्त गायत्री होम, भजन, प्रवचन, महाआरती, महाप्रसाद, भजन संध्या अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल याठिकाणी पाहायला मिळते आहे.

गुरूपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरू माऊलीला वंदन करण्यासाठी गजानन भक्त शेगाव मध्ये दाखल होत आहेत..मिनी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नगरीत आज भक्तांची मांदियाळी पहावयास मिळत आहे. गजानन महाराज यांना गुरू मानून त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गजानन भक्त आज शेगावात दाखल होत आहेत. आषाढी पौर्णिमेला दरवर्षी हजारो भक्त शेगावात गर्दी करत असतात. कोरोना काळात 2 वर्ष आषाढी पौर्णिमेचा हा गुरू शिष्याचा सोहळा साजरा करता आला नव्हता मात्र या वर्षी कारोना नियम शिथिल असल्याने राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येत आपल्या गुरू माऊलीला भेटण्यासाठी शेगावात दाखल होत आहेत.

गुरुपौर्णिमेनिमित्त नागपुरातील वर्धा रोडवरील साई मंदिरात दरवर्षी भक्तांची गर्दी होते मात्र पाऊस आणि वाहतूक कोंडीचा परिणाम साईबाबांच्या भक्तांवरही झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा भक्तांची गर्दी पाहायला मिळत नाही आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number