काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक

मुंबई ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :   जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथील हलान जंगल परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले. येथे गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबविण्यात येत होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात तींन जवान जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये […]

काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक

मुंबई ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :   जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथील हलान जंगल परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले. येथे गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबविण्यात येत होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात तींन जवान जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले. गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हलान जंगल परिसरात शोध मोहीम सुरू केली होती. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. येथे पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांना जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात तीन जवान जखमी झाले. उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.

श्रीनगरच्या चिनार कॉर्प्सने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “या जोरदार गोळीबारात तीन जवान जखमी झाले, ज्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.” दहशतवाद्यांसोबत गोळीबार वाढल्यानंतर येथे अतिरिक्त जवान पाठवण्यात आले आहेत. नुकतेच श्रीनगरमध्ये पोलिसांनी रेझिस्टन्स फ्रंटशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. याशिवाय ले लष्कर-ए-तैयबासाठी काम करायचे. एका पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, गुप्तचर अहवाल मिळाल्यानंतर एका पोलिस पथकाने चौकी तयार केली होती. त्यानंतर या दहशतवाद्यांना पकडण्यात आले. इम्रान नजर, वसीम अहमद मट्टा आणि अधिवक्ता अहमद भट अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही श्रीनगरच्या आसपासच्या भागातील रहिवासी आहेत. याशिवाय दहशतवाद्यांकडून १० पिस्तूल, २५ एके-४७ आणि अनेक गोळ्या जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिवक्ता अहमद भट यापूर्वी देखील ISJK मध्ये सक्रिय होते आणि अलीकडेच मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आले आहेत.

यापूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे १० जवान शहीद झाले होते. पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक झाली. दोन दशकांनंतर या भागांना दहशतवादमुक्त घोषित करण्यात आले. पूंछमध्ये जुलै महिन्यात सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हे दहशतवादी परदेशी असल्याचे सांगण्यात आले. खोऱ्यात सुमारे ५० दहशतवादी सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यापैकी निम्मे विदेशी आहेत. आज जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याला ४ वर्ष पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी दहशतवाद्यांबरोबर जवानांची चकमक होत आहे. यावेळी भाजपने श्रीनगरमध्ये विजयी पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे. सकाळी 9.30 वाजता नेहरू पार्क येथून निघणारी ही विजयी पदयात्रा शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरपर्यंत जाईल. त्याचवेळी खबरदारी म्हणून आज ५ ऑगस्ट होणारी अमरनाथ यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number