Encounter In Bijapur: छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये चकमक; सहा माओवाद्यांना कंठस्नान, 2 जवान शहीद

या भीषण चकमकीत जिल्हा राखीव रक्षक दलाचे (डीआरजी) दोन जवान शहीद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Encounter In Bijapur: छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये चकमक; सहा माओवाद्यांना कंठस्नान, 2 जवान शहीद

Encounter In Bijapur: छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. यात सहा  माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या भीषण चकमकीत जिल्हा राखीव रक्षक दलाचे (डीआरजी) दोन जवान शहीद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दंतेवाडा–बिजापूर सीमेवरील दाट जंगलांनी व्यापलेल्या गंगलूर परिसरात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये तब्बल दोन तास चकमक सुरू होती.

डीआरजी, स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि सीआरपीएफच्या कोब्रा युनिटने संयुक्तपणे हे ऑपरेशन राबवले. दंतेवाडा विभागाचे डीआयजी कमलोचन कश्यप यांनी सांगितले की, सध्या तरी सहा माओवाद्यांचा मृत्यू झाल्याचे निश्चित असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत. चकमक अद्याप सुरू असल्यामुळे ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. माओवाद्यांना मोठ्या संख्येने वेढण्यात दलाला यश मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Rajnath Singh : 'नेहरुंना सरकारी पैशाने अयोध्येत बाबरी मशीद बांधायची होती, पण…' राजनाथ सिंह यांचं मोठं विधान

या वर्षातील माओवादीविरोधी मोहिमेत छत्तीसगडमध्ये आतापर्यंत 268 माओवाद्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी तब्बल 239 बस्तर विभागात ज्यात बिजापूर आणि दंतेवाडाचा समावेश आहे. तर आणखी 27 माओवादी गरियाबंदमध्ये आणि दोघे मोहला-मानपूर-अंबागड चौकी जिल्ह्यात मारले गेले.

हेही वाचा – Sanchar Saathi App: Apple-Google सरकारी आदेशाला कायदेशीर आव्हान देण्याची शक्यता; युजर्सच्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीची व्यक्त केली चिंता

दरम्यान, 30 नोव्हेंबर रोजी दंतेवाडामध्ये माओवादी चळवळीतून बाहेर पडत 37 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यापैकी 27 जणांवर एकूण 65 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये कुमाली उर्फ अनिता मांडवी, गीता उर्फ लक्ष्मी मडकम, रंजन उर्फ सोमा मांडवी आणि भीमा उर्फ जहाज कलमू यांसारखे महत्त्वाचे चेहरे होते, ज्यांच्यावर प्रत्येकी 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. राज्य शासनाच्या धोरणानुसार आत्मसमर्पण केलेल्यांना 50,000 रुपयांची तातडीची मदत, कौशल्य विकास प्रशिक्षण, शेतीयोग्य जमीन आणि समाजात पुन्हा उभे राहण्यासाठी विविध सुविधा दिल्या जाणार आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number