अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे पाठ

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत ९६ वे अखिल भारतील मराठी संमेलन सुरू आहे. तर दुसरीकडे सर्कस ग्राउंड मैदानात १७ वे अखिल भारतीय मराठी विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाला हुलकावणी देत नागरिकांनी विद्रोही संमेलनाला हाऊसफुल्ल गर्दी केल्याचे दिसले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तीन फेब्रुवारी पासून सुरू झाले. पहिल्या दिवशी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली […]

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे पाठ

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत ९६ वे अखिल भारतील मराठी संमेलन सुरू आहे. तर दुसरीकडे सर्कस ग्राउंड मैदानात १७ वे अखिल भारतीय मराठी विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाला हुलकावणी देत नागरिकांनी विद्रोही संमेलनाला हाऊसफुल्ल गर्दी केल्याचे दिसले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तीन फेब्रुवारी पासून सुरू झाले. पहिल्या दिवशी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती तर दुसऱ्या दिवशी मात्र खुर्च्या पूर्णपणे रिकाम्या दिसल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवली आहे. नरेंद्र चपळगावकर यांचे अध्यक्षीय भाषण सुरू असताना सुद्धा मुख्य सभागृहात ९०% खुर्च्या रिकाम्या होत्या. दुसऱ्या दिवशीही फारशी स्थिती बदललेली नाही. त्यामुळे साहित्य संमेलन सरकारी अनुदानावर चालणारी सहल बनले आहे का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

शनिवारी सकाळच्या सत्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांच्या प्रकट मुलाखतीच्या वेळी काही प्रमाणात प्रेक्षक सभागृहात उपस्थित होते. मात्र दुपारच्या सत्रात कृषी विषयक आणि इतर विषयांवरील चर्चासत्राच्या वेळेला बोटावर मोजणे इतकेच प्रेक्षक सभागृहात पाहायला मिळाले. त्यामुळे यापूर्वीच्या साहित्य संमेलनांच्या तुलनेत वर्ध्यातील या साहित्य संमेलनाला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असल्याचा चित्र आहे. काहींना या मध्ये आयोजकांची चूक वाटत असून आयोजकांनी विविध चर्चासत्रे, व्याख्याने, परिसंवादाची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नच केले नसल्याचे वाटत आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मिळत असलेल्या अल्प प्रतिसादाचा फटका ग्रंथ विक्रेते आणि प्रकाशकांनाही बसत आहे. एका स्टॉल साठी 7000 याप्रमाणे हजारो रुपये खर्चून, पुस्तक आणण्यासाठी हजारो रुपये खर्च करून विक्रेत्यांनी आपल्या पुस्तक विक्रीचे स्टॉल्स लावले आहे. मात्र कालपासून वाचकांची उपस्थिती अत्यल्प असल्यामुळे फारशी पुस्तक विक्री होऊ शकत नाही आहे. त्यावर वर्ध्यातील तीव्र उन्हाने पुस्तक विक्रीवर विपरीत परिणाम केले आहे. कालचा तुलनेत आज काही अंशी ग्राहक पुस्तक खरेदीसाठी आले असले, तरी यापूर्वीच्या साहित्य संमेलनाच्या तुलनेत पुस्तक खरेदीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number