राज्याच्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीवर भर

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर देण्यात आला असून, सरकारनं या सर्वच क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. कृषी क्षेत्र २० लाख शेतकऱ्यांन अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा सरकारचा निर्णय मूल्य साखळी योजनेसाठी १ […]

राज्याच्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीवर भर

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर देण्यात आला असून, सरकारनं या सर्वच क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

कृषी क्षेत्र

  • २० लाख शेतकऱ्यांन अनुदानाचा लाभ
  • शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा सरकारचा निर्णय
  • मूल्य साखळी योजनेसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद
  • शेततळ्याच्या अनुदानात वाढ करून ७५ कोटी रुपये
  • नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या दिलेल्या वचनाची पूर्ती

आरोग्य

  • आरोग्य सुविधावर ११ हजार कोटी रुपयांचा खर्च.
  • अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी नवाजत शिशू आणि माता यांच्यासाठी स्त्री रुग्णालये स्थापन करण्यात येतील.
  • सर्व जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारणार

मनुष्यबळ विकास

  • लता मंगेशकर संगीत विद्यापीठासाठी कलिना विद्यापीठात जागा आणि १०० कोटींचा निधी
  • रोजगार क्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी महसूल विभागाला ५०० कोटी रुपयांची तरतूद
  • तृतीयपंथांसाठी ओळखपत्र आणि शिधापत्रिका मोहिम
  • बार्टीला २५० कोटींचा निधी
  • नालेसफाईसाठी स्वयंचलित यंत्रणा
  • सामाजिक न्याय विभागाला २ हजार ८७६ कोटींची तरतूद
  • ३ लाख ३० हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष

दळणवळण

  • पुणे रिंग प्रकल्पास्टी १ हजार ९०० हेक्टर जमीन अधीग्रहण – १ हजार ५०० कोटी
  • स्टी महामंडळ वेतनासाठी ४१०७ कोटींची तरतूद
  • नगरविकास विभागास ८ हजार ८०० कोटींची तरतूद
  • शिर्डी विमानतळासाठी १५० कोटी रुपयांचा निधी
  • अमरावती विमानतळ रात्रीची उड्डाणसेवा, गडचिरोलीत नवीन विमानतळ
  • राज्यात ई-वाहनाची सुविधा वाढवणार

उद्योग

  • विद्युत वाहनांची नोंदणी १५७ टक्क्यांनी वाढली
  • महिलांना महिला बचत गटांच्या माध्यमातून भांडवलच्या कर्जावरील व्याजाची परतफेड करता येईल.
  • १५ हजार २१५ कोटी रुपयांची तरतूद

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number