‘निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’

सहाव्या जागेसाठी मतदान करताना महाविकास आघाडीची सहा मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.’निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’ असं देवेंद्र फडणवीसांनी महाडिकांच्या विजयानंतर ट्वीट केलं आहे. सुरुवातीपासून शिवसेनेच्या संजय पवारांचे पारडे जड असतानाही शेवटी भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे.  राज्यसभा निवडणुकीत झालेली विजय हा आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि दुसऱ्या लढवय्या मुक्ता […]

‘निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’

सहाव्या जागेसाठी मतदान करताना महाविकास आघाडीची सहा मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.’निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’ असं देवेंद्र फडणवीसांनी महाडिकांच्या विजयानंतर ट्वीट केलं आहे. सुरुवातीपासून शिवसेनेच्या संजय पवारांचे पारडे जड असतानाही शेवटी भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे.  राज्यसभा निवडणुकीत झालेली विजय हा आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि दुसऱ्या लढवय्या मुक्ता टिळक यांना समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणीवस यांनी दिली आहे. आमचे तिनही उमेदवार जिंकुल आले आहेत, हा आनंदाचा क्षण असल्याचा असही ते विजयानंतर म्हणाले आहेत.

यावेळ त्यांनी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, लक्ष्मणभाऊ अब्युलन्सने मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी मतदान केले. आमच्यासाठी लक्ष्मणभाऊ महत्वाचे आहेत. एखादी सिट आली काय, नाही आली काय, भविष्यात परत जिंकू मात्र लक्ष्मण भाऊंचा जीव महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या मुक्ता टिळक यांचेही आभार मानले आहे. पुढे ते म्हणाले, लक्ष्मण भाऊंने सांगितले, की काहीही झाले तरीही मी पक्षासाठी येणार, ते आले मी त्यांचा आभारी आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुक्ता टिळक यांचेही मनापासून आभार मानतो. मुक्ता टिळक या विपरित परिस्थितीत मुंबईत मतदानासाठी आल्या. गुरूवारी पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांनाही खास अब्युलन्लमधुन मुंबईत आणण्यात आले. स्ट्रेटरवरून त्या विधानभवनात पोहचल्या आणि त्यांनी मतदान केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number