‘कोल्हापूरकरांचा विजय होईल. एका भगिनीला हरवण्यासठी भाजपाने लादलेली ही निवडणूक आहे’, अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील दिली आहे. कोल्हापुरातून पहिली महिला आमदार बनण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळणार असल्याचा विश्वासही सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी पार पडलेल्या मतदानाची आज मतमोजणी सुरू आहे. पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत सुरूवातीपासूनच काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत आमचा विजय होईल, याची मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा पुण्यात आहे. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.