गेल्या दोन वर्षापासून कोणतेही सण उत्साहात साजरे झालेले नाही. दरम्यान, रमजान ईद हा सण देखिल घरीच सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. सध्या कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले असून मंगळवारी मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जाणार आहे. आज ईदचे चंद्र दर्शन झाले.
ईद निमित्ताने मुस्लिमांकडून मोठ्या प्रमाणात बाजारात खरेदी सुरू आहे. मागील २ वर्ष कोरोनामुळे मुस्लिमांनानी ईद घरीच साजरी केली होती आणि आता कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यामुळे बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी पहायला मिळत आहे. नागरीकांमध्ये मोठ्या प्रमामात उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. ईदला लोकं एकमेकांना शुभेच्छा देतात, प्रार्थना करतात तसंच ईदी सुद्धा देतात. कोरोनामध्ये मुस्लिमांना ईदच्या दिवशी नमाज घरुनच अदा करावा लागत होता पण आता कोणतेही निर्बंध नसल्याने ते मशिदीमध्ये जाऊन प्रार्थना करु शकतात.