संजय राऊतांना पुन्हा ईडी समन्स

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. राज्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना बजावलेली नोटीस महत्त्वाची मानली जाते. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे […]

संजय राऊतांना पुन्हा ईडी समन्स

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. राज्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना बजावलेली नोटीस महत्त्वाची मानली जाते. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.

दरम्यान, यापूर्वी ईडीनं संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीनं प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांची ९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. तसेच, काही दिवसांपूर्वी ईडीकडून संजय राऊतांची चौकशी करण्यात आली होती. आज दुसऱ्यांदा ईडीकडून राऊतांची चौकशी केली जाणार आहे. संजय राऊत यांची १ जुलै रोजी ईडीनं तब्बल १० तास चौकशी केली होती. ईडीही केंद्राची तपासयंत्रणा असून आपण ईडीला पूर्ण सहकार्य केलं. त्यांच्या मनात काही शंका असतील तर आमच्या सारख्या लोकांनी त्या दूर केल्या पाहिजेत, असा खोचक टोला देखील संजय राऊत यांनी लगावला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number