सांगलीमध्ये शुक्रवारी (दि. २३ जून) सकाळी ईडीची दोन पथकं दाखल झाली आहेत. शिवाजीनगरमधील सुरेश आणि दिनेश पारेख बंधू यांच्या दोन बंगल्यात चौकशी करत आहेत. ईडीचे अधिकारी चौकशी करत असलेल्या बंगल्याबाहेर सीआरएफचे जवान तैनात केले आहेत. पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक आहेत. सध्या कोणताही तपशील माध्यमांना देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. र.
आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरुन ही चौकशी सुरु असल्याचे समजतं. पारेख बंधूंच्या बंगल्यामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या चौकशीबद्दल स्थानिक पोलिसांनी सुद्धा येऊन चौकशी करुन माहिती घेतली आहे. पारेख बंधूंच्या दोन बंगल्यामध्ये चौकशी करण्याबरोबरच ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी काही बँकांमध्ये जाऊन पारेख बंधूंशी संबंधित खात्याची चौकशी देखील करायला सुरुवात केली आहे.
पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक आहेत. या पारेख बंधूंचा इलेक्ट्रिकलचा मोठा व्यवसाय आहे. सांगली शहरातील गणपती पेठ भागात त्यांची इलेक्ट्रिकल्सची दुकान आहेत. त्यांचा शिवाजीनगर परिसरात बंगला आहे. या बंगल्यात आज ईडीचे पथक पहाटेच्या सुमारास चौकशीसाठी आले. या बंगल्याबाहेर सीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.