नितेश राणे यांच्यामुळे नगर इथे राजकीय चर्चांना उधाण

नगर हा जिल्हा सुरवातीपासून अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा आहे. काही दिवसांपासून नगर शहरातील समस्यांकडे बघता नगर जिल्ह्याला राजकीय वाली आहे की नाही अशी परिस्थिती होताना दिसत होती. मात्र अशी परिस्थिती असतांना आमदार नितेश राणे यांनी नगर जिल्ह्यातील हिंदूंच्या समर्थनार्थ विविध माध्यमातून न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आले. वेळोवेळी अधिवेशनात […]

नितेश राणे यांच्यामुळे नगर इथे राजकीय चर्चांना उधाण

नगर हा जिल्हा सुरवातीपासून अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा आहे. काही दिवसांपासून नगर शहरातील समस्यांकडे बघता नगर जिल्ह्याला राजकीय वाली आहे की नाही अशी परिस्थिती होताना दिसत होती. मात्र अशी परिस्थिती असतांना आमदार नितेश राणे यांनी नगर जिल्ह्यातील हिंदूंच्या समर्थनार्थ विविध माध्यमातून न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आले. वेळोवेळी अधिवेशनात विधान सभेत परखडपणे नगर जिल्ह्यातील भूमिका घेणे, विविध समस्यांवर प्रशासनाला धारेवर धरणे, लव जिहाद,धर्मांतरण अशा विविध मोर्चाचे नेतृत्व आणि सहभाग त्यांनी नोंदवला आणि एकंदरीत महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी हिंदूविरोधी काम केले त्या अधिकाऱ्यांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला आहे.

नगर जिल्ह्यात आजपर्यंत सुमारे दहा पोलीस अधिकाऱ्यांना नितेश राणे यांनी निलंबित करायला भाग पाडले आहे. तसेच लवजिहाद धर्मांतरण अशा विविध माध्यमातून जिहाद्यांवर गुन्हे दाखल करून काही जणांवर मोक्का अंतर्गत कारवाही करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून कारवाई करून घेतली आणि नगर येथील हिंदूना न्याय मिळवून देण्यात त्याचा मोलाचं वाटा आहे आणि याबाबत नगरकर नक्कीच त्याचे ऋणी असतील.

पण नगर जिल्ह्यातील समस्या आणि त्या समस्या मार्गी लावण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील आमदार थेट नगर येथे येवून मार्गी लावतो याचे नगरकरांनी जोरदार स्वागतच केले आहे. कारण आजपर्यंत हिंदुत्व या विषयात नगरकरांना वाली नव्हता. पण आज नितेश राणे यांच्या स्वरूपात नगर जिल्ह्याला एक आधारस्तंभ मिळाला आहे अशी जनमाणसात प्रतिक्रिया नगर जिल्ह्यात ऐकायला आहे. असे समजते की, आमदार नितेश राणे यांच्या कामाला महाराष्ट्रासह नगरकरांनी पसंती दर्शवली आहे आणि त्यामुळे, ते पुढची विधानसभा नितेश राणे नगर मधून लढवतात की काय अशा चर्चांना उधाण आले आहे. तसेच ही लोकभावना देखील आहे असे कळते.

याबाबत आमदार नितेश राणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी म्हणाले की, ‘मी हिंदू लोकांचा पाठीशी उभा आहे. फक्त निवडणूक लढवणे हा माझा अजेंडा नसून नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात कुठेही माझ्या हिंदू बांधवांवर किंवा भगिनीवर जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून त्रास द्यायचा प्रयत्न झाला तर त्यांच्या पाठीशी नितेश राणे भक्कमपणे उभा असेल आणि कायम राहील.’ असे त्यांनी सांगितले.

गेल्या महिनाभरापासून नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी जिहाद्यांकडून हिंदू लोकांवर हल्ले करण्यात आलेत. जागोजागी गाड्यांची तोडफोड, जाळपोळ करविण्यात आली आणि काही ठिकाणी प्रशासनाची देखील चूक होती. याचा प्रचंड त्रास नगरवासियांना झाला आणि काही निष्पाप हिंदू मुलांवर चुकीच्या खोट्या केसेस देखील टाकण्यात आल्या. पण, त्यावेळी नगरकरांना काही स्थानिक राजकीय नेतृत्वाकडून अपेक्षा होत्या. पण त्यांच्या मदतीसाठी स्थानिक नेतृत्व आले नाही. त्यावेळी काही हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांना संपर्क केला आणि नगर जिल्ह्यातील एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी क्षणाचा विचार न करता थेट नगर गाठले. तिथे आपल्या शैलीतून मुद्द्याला हात घालत प्रत्येक पीडित कुटुंबाची भेट घेऊन न्याय मिळवून दिला. त्यामुळे, नगरकर ह्या बाबतीत त्याचे उपकार कदाही विसरणार नाहीत. पण या संपूर्ण परिस्थितीवरून असे कळते की नगर जिल्ह्यात भविष्यात राजकीय समीकरणे नक्कीच बदलतील यात शंका नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number