Dream Life: अशुभ बातमी कळते! स्वप्नात या 3 गोष्टी दिसणं धोक्याचा संकेत! काहीतरी वाईट घडतं

स्वप्नशास्त्रातनुसार, काही स्वप्ने येणाऱ्या काळात एखाद्या व्यक्तीला येणाऱ्या अडचणी-संकटे दर्शवतात. ही स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तीने थोडे सावध राहिले पाहिजे.

Dream Life: अशुभ बातमी कळते! स्वप्नात या 3 गोष्टी दिसणं धोक्याचा संकेत! काहीतरी वाईट घडतं

मुंबई : झोपेत स्वप्न न पाहिलेला माणूस शोधून सापडणार नाही, प्रत्येकाला स्वप्न पडत असतं. मानवी जीवनात स्वप्न पाहणं ही एक सर्वसाधारण बाब आहे. बरेच लोक स्वप्नांना कॉमन मानून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्ने एखाद्या व्यक्तीला त्याच्या भविष्याबद्दल चांगले आणि वाईट संकेत देतात. प्रत्येक स्वप्न काही ना काही संकेत देतेच असे नाही. परंतु शास्त्रांनुसार, स्पष्टपणे आणि विशिष्ट वेळी दिसणारी स्वप्ने भविष्याबद्दल काही संकेत देतात, असे मानले जाते.

स्वप्नशास्त्रातनुसार, काही स्वप्ने येणाऱ्या काळात एखाद्या व्यक्तीला येणाऱ्या अडचणी-संकटे दर्शवतात. ही स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तीने थोडे सावध राहिले पाहिजे. स्वप्नशास्त्रात तीन स्वप्नांचा उल्लेख आहे, त्यापैकी एक स्वप्न लंकेचा राजा रावणाने पाहिले होते, ते पाहून रावणही घाबरला होता. स्वप्नांबद्दल आणि त्यातून मिळणाऱ्या संकेतांबद्दल जाणून घेऊया.

हेही वाचा – Ganga River: भारतात अशी कोणती जागा, तिथं गंगा नदी उलटी वाहते? काय आहे श्रद्धेचा अद्भुत संयोग!

स्वप्नात कोणाचे तरी लग्न होताना पाहणे – लग्न हा एक अतिशय शुभ आणि मंगलमय प्रसंग आहे. पण जर आपल्याला स्वप्नात दुसऱ्याचे लग्न दिसले तर ते अजिबात चांगले मानले जात नाही. स्वप्नशास्त्रानुसार, असे मानले जाते की ज्या व्यक्तीला अशी स्वप्ने पडतात त्याने सतर्क राहावे. कारण ज्या व्यक्तीला अशी स्वप्ने पडतात, त्याच्या आयुष्यात अशी काही समस्या येऊ शकते जी तुम्हाला मृत्यूसारखे दुःख देऊ शकते. असे स्वप्न पडले असेल तर सावध रहा.

स्वप्नात झाड पडताना पाहणे – स्वप्नशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात झाड पडताना दिसले तर ते खूप अशुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न भविष्यात अपघात, आजार किंवा इतर कोणत्याही वाईट घटनेचे संकेत देते. म्हणून, असे स्वप्न पडले तर सावधगिरी बाळगा.

हेही वाचा – शनीदेव आहेत मेहरबान! मग चिंता कसली.. पुढच्या दीड महिन्यात 'या' राशी होणार मालामाल

गाढवावर बसल्याचं स्वप्न – स्वप्नशास्त्रानुसार, हे रावणाचे स्वप्न होते, ज्यामुळे तो घाबरला आणि चिंताग्रस्त झाला होता. रावणाने स्वप्नात स्वतःला गाढवावर स्वार होऊन दक्षिणेकडे जाताना पाहिले होते. रामचरितमानसानुसार, रावण जेव्हा भगवान रामाशी युद्ध करत होता, तेव्हा त्याला हे स्वप्न पडले होते. स्वप्नशास्त्रानुसार, असे स्वप्न पराभव किंवा मृत्यू दर्शवते.

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number