Stone In Bladder : वजन 3.1 किलो…लांबी 18.7 सेमी…, गर्भातील पूर्णवाढ झालेल्या बाळाइतक्या वजनाचा खडा मूत्राशयात; दुर्मिळ शस्त्रक्रीयेची सर्वत्र चर्चा

श्रीलंका : श्रीलंकेतील डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या मूत्राशयातून 3.1 किलो (6.8 पौंड) वजनाचा खडा यशस्वीरीत्या बाहेर काढला आहे. हा अशा प्रकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा खडा असल्याचे मानले जात आहे. ही शस्त्रक्रिया गेल्या आठवड्यात देशाच्या पूर्व भागातील त्रिंकोमाली येथील एका रुग्णालयात करण्यात आली. 55 वर्षीय रुग्णाला 'स्ट्रोक'चा (मेंदूचा झटका) त्रास झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार […]

Stone In Bladder : वजन 3.1 किलो…लांबी 18.7 सेमी…, गर्भातील पूर्णवाढ झालेल्या बाळाइतक्या वजनाचा खडा मूत्राशयात; दुर्मिळ शस्त्रक्रीयेची सर्वत्र चर्चा

श्रीलंका : श्रीलंकेतील डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या मूत्राशयातून 3.1 किलो (6.8 पौंड) वजनाचा खडा यशस्वीरीत्या बाहेर काढला आहे. हा अशा प्रकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा खडा असल्याचे मानले जात आहे. ही शस्त्रक्रिया गेल्या आठवड्यात देशाच्या पूर्व भागातील त्रिंकोमाली येथील एका रुग्णालयात करण्यात आली. 55 वर्षीय रुग्णाला 'स्ट्रोक'चा (मेंदूचा झटका) त्रास झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्याला लघवी करताना त्रास होत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तपासणीत त्याच्या मूत्राशयात खडा असल्याचे आढळून आले. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी हा खडा बाहेर काढला. या खड्याचे वजन पूर्ण वाढ झालेल्या बाळाच्या वजनाइतके होते. त्याचा आकार साधारणपणे शहामृगाच्या अंड्याएवढा होता. "उपलब्ध नोंदींनुसार, शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मूत्राशयातील खडा आहे," असे या शस्त्रक्रियेचे नेतृत्व करणारे डॉ. प्रगलाथन बालकृष्णन यांनी सांगितले. दरम्यान, रुग्णाची प्रकृती अतिशय उत्तम असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : Nashik Crime : ‘जळालेल्या प्रेताची राख महिलेच्या अंगावर फेकली अन्…’ प्रियकरासोबत लग्नाचं आमिष दाखवून महिलेकडून पैसे उकळले; नाशिक हादरलं

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण अजूनही रुग्णालयातच असून त्याच्या इतर वैद्यकीय समस्यांवर उपचार सुरू आहेत. डॉ. बालकृष्णन यांनी पुढे सांगितले की, हा खडा रुग्णाच्या मूत्राशयात साधारणपणे पाच ते दहा वर्षांपासून असावा. जेव्हा लघवीतील खनिजांचे स्फटिक तयार होऊन त्यांचे घट्ट गोळे बनतात, तेव्हा मूत्राशयात खडे (bladder stones) तयार होतात. जेव्हा मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नाही आणि त्यात साचून राहिलेली लघवी अधिक तीव्र (concentrated) होऊन तिचे स्फटिकांमध्ये रूपांतर होते, तेव्हा सहसा असे खडे तयार होतात.

वाळूच्या कणांइतके लहान खडे स्वतःहून शरीराबाहेर पडू शकतात. मात्र, 1 सेमीपेक्षा मोठे खडे अनेकदा लघवीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतात आणि त्यांच्यासाठी वैद्यकीय उपचारांची गरज भासते. 4 सेमीपेक्षा मोठ्या आकाराच्या मूत्राशयातील खड्याला 'विशाल' (giant) मानले जाते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, 2003 मध्ये ब्राझीलमधील एका रुग्णाच्या शरीरातून सर्वात मोठा मूत्राशयातील खडा काढण्यात आला होता. त्याचे वजन 1.9 किलो (4.2 पाउंड) आणि लांबी 17.9 सेमी (7 इंच) होती. गेल्या आठवड्यात श्रीलंकेत काढण्यात आलेल्या मूत्राशयातील खड्याची लांबी 18.7 सेमी इतकी होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number