Ditwah Cyclone: श्रीलंकेत ‘दितवाह’ चक्रीवादळाचा कहर;150 हून अधिक मृत, भारताच्या मदतकार्यातून दिलासा

‘दितवाह’ चक्रीवादळामुळे श्रीलंकेत 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून लाखो नागरिक विस्थापित झाले आहेत. पूर, भूस्खलन आणि ढिगाऱ्यांमुळे बचावकार्य अडथळ्यात आहे.

Ditwah Cyclone: श्रीलंकेत ‘दितवाह’ चक्रीवादळाचा कहर;150 हून अधिक मृत, भारताच्या मदतकार्यातून दिलासा

श्रीलंकेत धडकलेल्या 'दितवाह' (Ditwah Cyclone) या भयानक चक्रीवादळामुळे देशभर भीषण नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पूर, भूस्खलन आणि ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालेल्या लोकांची संख्या जलदगतीने वाढत आहे. सरकारने सांगितले की चक्रीवादळात 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. देशातील अनेक भागांमध्ये सामान्य जीवन ठप्प झाले असून बचाव पथके युद्धपातळीवर काम करत आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी देशात आपत्काल जाहीर केला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तसेच वीजपुरवठा आणि मोबाइल सेवा कोसळल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

हजारो कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून 798 छावण्यांमध्ये एक लाखाहून अधिक नागरिक आश्रयाला आहेत. दरम्यान, संकटाच्या या काळात भारताने शेजारी देशाला तत्काळ मदतीचा हात दिला आहे. ‘ऑपरेशन सागर बंधु’ अंतर्गत भारतीय वायुसेनेने 21 टनाहून अधिक मदतसाहित्य श्रीलंकेत पोहोचवले. दोन सैन्य विमानांद्वारे अन्न, आवश्यक साहित्य, औषधे, यंत्रसामग्री आणि NDRF चे 80 हून अधिक कर्मचारी तेथे पाठवले गेले आहेत.

हेही वाचा: Bank Holidays in December 2025: डिसेंबर महिन्यात एकूण 19 दिवस बँका राहणार बंद ; सलग 5 दिवस असणार सुट्टी

यापूर्वीही सहा टन साहित्याची पहिली खेप श्रीलंकेत दाखल झाली होती. श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार 191 लोक अद्याप बेपत्ता असून शोधमोहीम अविरत सुरू आहे. एकूण 25 जिल्ह्यांतील 7.74 लाख लोकांवर या चक्रीवादळाचा थेट परिणाम झाला आहे. पन्नाला भागातील वृद्धाश्रमातील 25 लोकांना पूर वाहून नेत असताना त्यापैकी 14 जणांना वाचवण्यात यश आले.

तज्ञांनी इशारा दिला आहे की चक्रीवादळ श्रीलंका सोडून पुढे गेल्याने धोका कमी झाला असला तरी त्याचे अप्रत्यक्ष परिणाम अद्याप कायम राहतील. अनेक प्रांतांत आजही 100 ते 150 मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले. श्रीलंकेसाठी मदतीचा ओघही सुरू आहे. अमेरिकेने 20 लाख डॉलर तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे, तर मालदीवने 50 हजार डॉलर आणि टूना माशांच्या 25 हजार कॅन्स देण्याचा निर्णय घेतला आहे. मानवतावादी मदत आल्याने संकटात सापडलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Noida Horror: नोएडा हादरलं! लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने 25 वर्षीय तरुणीवर झाडल्या गोळ्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number