बुलढाणा, १८ मे २०२३, प्रतिनिधी : चिखली शहरातील एका लग्न वरातीमध्ये बुधवारी सायंकाळी आक्षेपार्ह गाणे वाजवण्यावरून झालेल्या वादानंतर तणाव निवळत असतानाच काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिल्याने वातावरन चिघळले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये अनेक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरातील सैलानी नगर परिसरात काल सायंकाळी एका लग्नाची वरात निघालेली होती. मात्र या वरातीत आक्षेपार्ह गाणे वाजवण्याच्या कारणावरून काही हुल्लड मुलांच्या दोन गटात वाद झाला होता. यावेळी पोलिसांच्या आणि प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्तीने वाद मिटल्यावर ही रात्रीला काही यावेळी मात्र दोन्ही गटात चांगलाच वाद पेटल्यावर दोन्ही गटाकडून दगडफेक झालीय . पोलिसांना हा जमाव पांगवण्यासाठी तत्काळ पोलिसांची जादा कुमक बोलाविली आणि त्यांच्यावर लाठीचार्ज सुद्धा यावेळी करावा लागला , आणि परिस्थिती नियंत्रण मध्ये आणायचा प्रयत्न केलाय. या लाठीचार्ज मध्ये अनेक जण जखमी झाले असून उपचार घेत आहेत. या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनला दोन्ही गटातील लोकांवर कलम १६० भादवीसह कलम १३५, १४३,१४७,१४८, १४९, ३२४, ३३७, ३४१ आयपीसी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ प्रमाणे ३१ जणासह इतर २५ जनावर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील पाच आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली असून सध्या सैलाणी नगर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. तर पोलिस सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली आहे.