कोल्हापूर, सांगलीची पूर परिस्थीतीत जरी सुधारणा झाली असली अनेक लोकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांच्या घराची पडझड झाली आहे. तर संसारउपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात खराब झालं आहे, चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा असल्याने प्रशासनाची मदत वेळेत पोहोचत नाही. कोल्हापूर , सातारा ,सांगलीकरांसाठी अनेक ठिकाणाहून मदत येत आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केली पूर परिस्थितीची पाहणी केली आहे.
कोल्हापूर, सांगलीची पूर परिस्थीतीमुळे अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. महाराष्ट्रातून या दोन जिल्ह्यांना मदत होतं आहे. तर संसारउपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात खराब झालं आहे, चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा असल्याने प्रशासनाची मदत वेळेत पोहोचत नाही. कोल्हापूर , सातारा ,सांगलीकरांसाठी अनेक ठिकाणाहून मदत येत आहे.
सांगली मध्ये आज पूर परिस्थितीची पाहणी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केली. तसेच पुराचे राजकारण करू नये अनेक मदत येते सांगलीला पण ती नागरिकांच्या पर्यंत पोहचली नसल्याचे दीपाली यांनी सांगितले. तसेच सांगली मधील तब्बल 1 हजार मुलीचे लग्न करून देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. तसेच त्याच्यांकडून 5 कोटींची मदत ही सांगली पूर ग्रामस्थांना देणार असल्याचे सांगितले.