उरण तालुक्यातील धुतूम ग्रामस्थ आक्रमक

उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील रांजणपाडा रेल्वे स्थानकाचे नाव दुरुस्त करून धुतूम रेल्वे स्थानक करावे या मुख्य मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत. नामांतरणासाठी धुतूम गावातील ग्रामस्थ्यांनी थेट रेल्वे स्थानकातच ठिय्या आंदोलन केले. यासोबतच रेल्वे स्थानकात धुतूम गावातील बेरोजगार तरुणांना नोकरी द्यावी, रेल्वे स्थानकात व्यवसाय उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी या विविध मागण्यांसाठी धुतूम ग्रामस्थांनी आक्रमक होत […]

उरण तालुक्यातील धुतूम ग्रामस्थ आक्रमक

उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील रांजणपाडा रेल्वे स्थानकाचे नाव दुरुस्त करून धुतूम रेल्वे स्थानक करावे या मुख्य मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत. नामांतरणासाठी धुतूम गावातील ग्रामस्थ्यांनी थेट रेल्वे स्थानकातच ठिय्या आंदोलन केले. यासोबतच रेल्वे स्थानकात धुतूम गावातील बेरोजगार तरुणांना नोकरी द्यावी, रेल्वे स्थानकात व्यवसाय उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी या विविध मागण्यांसाठी धुतूम ग्रामस्थांनी आक्रमक होत आंदोलन केले आहे.

या मोर्चात रेल्वे स्थानकाला धुतुम नाव मिळालेच पाहिजे, जमीन आमच्या हक्काची, ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो आदी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर धुतुम स्थानक नावाची प्रतिकृती ही आंदोलन कर्त्यांना स्थानकात लावली होती. गुरुवारी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, माजी सरपंच रेश्मा शरद ठाकूर, पी.जी. ठाकूर उपस्थित आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number