बागेश्वर धाममधील धीरेंद्र शास्त्री यांनी ‘संत तुकारामांची पत्नी त्यांना रोज मारायची’, संत तुकाराम महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यामुळे त्यांनी संत तुकाराम महाराजांची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने तसेच भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार देसाई यांनी केली आहे.
‘वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे परंतु संपूर्ण अभ्यास केल्याशिवाय कोणी अश्या प्रकारे बोलू नये’, असे मत संत तुकारामांचे वंशज आणि देहू संस्थेचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी मांडले आहे. ‘संतावर कोणी काही चुकीचे बोलू नये म्हणून कायदा बनवला पाहिजे’, अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे.
वारकऱ्यांच्या याच मागणीला भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार देसाई यांनी पाठिंबा दिला आहे.’धीरेंद्र शास्त्री यांनी तुकाराम महाराजांबद्दल बोलताना चुकीचा संदर्भ दिला आहे, ज्यामुळे संत तुकाराम आणि त्यांच्या पत्नीच्या प्रतिमेला ठेच पोहचली आहे, त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींनी तुकाराम महाराजांची माफी मागावी’, असे तुषार देसाई म्हणाले आहेत.
एकीकडे भाजपचे काही नेते वीरेंद्र शास्त्रींच्या समर्थनार्थ उभे राहिले असताना, दुसरीकडे भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार देसाई यांनी धीरेंद्र शास्त्रींनी संत तुकारामांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.