Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत अफवा; ईशा देओल व हेमा मालिनी यांनी सांगितली खरी माहिती

धर्मेंद्र यांची तब्येत सध्या स्थिर आहे आणि ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी पुढील अद्ययावत माहिती योग्य वेळी दिली जाईल.

Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत अफवा; ईशा देओल व हेमा मालिनी यांनी सांगितली खरी माहिती

मुंबई: धर्मेंद्र यांनाआजारामुळे मागील काही दिवसांपासून त्रास होत होता. 31 ऑक्टोबर रोजी त्यांना श्वास घेण्यात अडचण जाणवल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या त्यांच्या मृत्यूसंबंधित अफवांनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

त्यांची मुलगी ईशा देओलने मंगळवारी सकाळी आपल्या इन्स्टाग्रामवर एक निवेदन जारी करत सांगितलं की, “माझे वडील स्थिर आहेत आणि त्यांची तब्येत सुधारत आहे. काही माध्यमं चुकीची माहिती पसरवत आहेत, परंतु सत्य हे आहे की ते उपचार घेत आहेत आणि प्रकृती सुधारते आहे.” धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओल यांच्या टीमनेही सोमवारी एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत सांगितले की, “धर्मेंद्र यांची तब्येत सध्या स्थिर आहे आणि ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी पुढील अद्ययावत माहिती योग्य वेळी दिली जाईल. आम्ही सर्व चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी आणि कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर राखावा.”

हेही वाचा: Prem Chopra Admitted In Hospital : ज्येष्ठ कलाकार प्रेम चोप्रा रुग्णालयात दाखल; ‘या’ आजारावर उपचार सुरू

याच पार्श्वभूमीवर धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी एक्सवर लिहिलं, “हे अत्यंत गैरजबाबदार आणि दुःखद आहे. काही माध्यमसंस्था चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, धर्मेंद्र हे उपचार घेत आहेत आणि त्यांची तब्येत सुधारत आहे. अशा प्रकारे खोटी माहिती पसरवणं अक्षम्य आहे. कृपया कुटुंबाला आवश्यक ती गोपनीयता द्या.” धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयीच्या अफवा पसरताच देशभरातील चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली आहे.

अनेक चाहत्यांनी #PrayForDharmendra हा हॅशटॅग वापरत त्यांच्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धर्मेंद्र यांच्या अलीकडील चित्रपटांमध्ये रॉकी और रानी की प्रेम कहानी (2023) आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया (2024) यांचा समावेश आहे. आता ते दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या युद्धपट इक्कीस मध्ये झळकणार आहेत, जो 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. कुटुंबीयांनी सर्व चाहत्यांना आश्वस्त केलं आहे की धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारत आहे आणि त्यांनी शांत राहून अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती केली आहे.

हेही वाचा: Major Blasts in India: भारताच्या सुरक्षेला हादरा देणाऱ्या स्फोटांची मालिका; कालानुक्रमाने जाणून घेवूयात

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number