CJP आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांचा डिजिटल तपास सुरू; अनेक युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स रडारवर

या तपासात काही युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स, डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडिया हँडल्सही चौकशीच्या कक्षेत आले आहेत.

CJP आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांचा डिजिटल तपास  सुरू; अनेक युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स रडारवर

CJPच्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी आता तपासाची दिशा बदलली असून त्यांचा भर डिजिटल माध्यमांवर आहे. आंदोलनाशी संबंधित प्रत्येक ऑनलाइन हालचालीवर लक्ष ठेवले जात असून, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, लाईव्ह स्ट्रीम, कमेंट्स आणि व्हायरल कंटेंटची सखोल छाननी केली जात आहे. या तपासात काही युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स, डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडिया हँडल्सही चौकशीच्या कक्षेत आले आहेत.

पोलिसांकडून विशेषतः आंदोलनाच्या ठिकाणाहून तयार करण्यात आलेल्या व्हिडिओंची पडताळणी केली जात आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कंटेंट क्रिएटर्सनी कोणती माहिती प्रसारित केली, त्यांच्या व्हिडिओंमध्ये केलेले दावे कितपत सत्य आहेत आणि व्हिडिओ एडिट करून चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला का, याचा तपास सुरू आहे.

यासाठी व्हिडिओंचे मूळ फुटेज आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिप्सची तुलना केली जात आहे. व्हिडिओतील काही भाग मुद्दाम कापण्यात आले होते का, वेगळ्या संदर्भात वापरण्यात आले होते का किंवा एडिटिंगद्वारे चुकीचे चित्र निर्माण करण्यात आले होते का, याचीही चौकशी केली जात आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी सोशल मीडियावरील हालचालींचे विश्लेषण अधिक व्यापक केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे 180 अतिरिक्त सोशल मीडिया अकाउंट्स तपासाच्या कक्षेत आणण्यात आले आहेत. आंदोलनाशी संबंधित अफवा, भडकाऊ मजकूर किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याचा संशय असलेल्या खात्यांची माहिती गोळा केली जात आहे. दिल्ली पोलिसांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि युट्यूबसह विविध सोशल मीडिया कंपन्यांशी संपर्क साधून आक्षेपार्ह, बनावट आणि छेडछाड केलेला कंटेंट हटवण्यास सांगितले आहे. आंदोलनानंतर अशा प्रकारचा मजकूर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number