Abhijeet Deepake: अभिजीत दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील कारवाईनंतर खळबळ

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतले. सोनम वांगचूक यांनाही आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात हलवण्यात आले. कारवाईनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण

Abhijeet Deepake: अभिजीत दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील कारवाईनंतर खळबळ

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शनिवारी मोठी पोलिस कारवाई करण्यात आली. आंदोलनाशी संबंधित अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांनी ते वास्तव्यास असलेल्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “दिल्ली पोलिसांनी मारहाण करून मला ताब्यात घेतले आहे,” अशी माहिती दिली.

दरम्यान, पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनाही दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळावरून हटवत ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवण्यात आले. गेल्या 21 दिवसांपासून ते NEET परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ आमरण उपोषण करत होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते.

शनिवारी सकाळपासूनच जंतर-मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारवाईदरम्यान आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनकर्त्यांनी पोलिस कारवाईचा निषेध करत घोषणाबाजी केली, तर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली.

याप्रकरणी जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनीही सोशल मीडियावर माहिती देत, अभिजीत दीपके यांना त्यांच्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आल्याचे तसेच सोनम वांगचूक यांनाही आंदोलनस्थळावरून ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले. दिल्लीतील या घडामोडींमुळे आंदोलनाला नवे वळण मिळाले असून, या कारवाईची देशभरात चर्चा सुरू आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number