Rajnath Singh on Delhi Blast : दिल्ली स्फोटप्रकरणी राजनाथ सिंह यांचे सूचक वक्तव्य!; जलद आणि काटेकोर चौकशी सुरू असल्याची दिली माहिती

राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्याला देशभरातून पाठिंबा मिळत असून या घटनेमागील कट उघड करण्यासाठी सर्व तपास यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत.

Rajnath Singh on Delhi Blast : दिल्ली स्फोटप्रकरणी राजनाथ सिंह यांचे सूचक वक्तव्य!; जलद आणि काटेकोर चौकशी सुरू असल्याची दिली माहिती

नवी दिल्ली: सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या कारमध्ये झालेल्या स्फोटामुळे भीषण आग लागली होती. या घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि देशभरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला गेला.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटाच्या चौकशीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की देशातील प्रमुख तपास यंत्रणा या घटनेची जलद आणि सखोल चौकशी करत आहेत आणि या भयानक स्फोटासाठी जबाबदार असणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. तसेच तपासाचा अहवाल लवकरच जनतेसमोर सादर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: PM Modi on Delhi Blast: लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणू”

राजनाथ सिंह यांनी मनोर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ऍनालिसिस (Manohar Parrikar Institute for Defence Studies and Analyses) यांच्या वतीने आयोजित दिल्ली डिफेन्स डायलॉग या कार्यक्रमात बोलताना या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले, “काल दिल्लीमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेत प्राण गमावणाऱ्या सर्व नागरिकांना मी मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खाच्या काळात सामर्थ्य आणि धैर्य लाभावे, अशी मी प्रार्थना करतो.” संरक्षण मंत्र्यांनी पुढे सांगितले, “या व्यासपीठावरून मी देशवासियांना खात्री देऊ इच्छितो की तपास संस्थांकडून जलद आणि काटेकोर चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यावर त्याचे निष्कर्ष जनतेसमोर ठेवले जातील. मी औपचारिकपणे आश्वासन देतो की या भीषण स्फोटामागे जे लोक आहेत, त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणले जाईल आणि त्यांना कोणतीही माफी मिळणार नाही.”

राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्याला देशभरातून पाठिंबा मिळत असून या घटनेमागील कट उघड करण्यासाठी सर्व तपास यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत. केंद्र सरकारने या प्रकरणाला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर विषय मानले असून लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: PM Modi Bhutan Visit: पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर; शेजारील देशाची ही भेट का महत्त्वाची आहे?

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number