प्रेग्नंसीनंतर दीपिका पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पाडुकोण सध्या तिच्या मातृत्वाच्या प्रवासाचा आनंद घेताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिकाने सध्या बॉलिवूडमधून थोडासा ब्रेक

प्रेग्नंसीनंतर दीपिका पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर

मुंबई – बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पाडुकोण सध्या तिच्या मातृत्वाच्या प्रवासाचा आनंद घेताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिकाने सध्या बॉलिवूडमधून थोडासा ब्रेक घेऊन तिच्या मुलीसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिका तिचा हा प्रवास तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करते. दीपिकाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे.

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी अभिनेत्री दीपिका आणि रणवीर सिंह यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरामध्ये जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर दीपिका आणि रणवीर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ‘आम्ही एका गोंडस मुलीचे आई बाबा झालो’ अशी आनंदाची बातमी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. 

दीपिकाने ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटामध्ये सुमती नावाच्या गर्भवती महिलेची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन यांसारखे मोठे कलाकार देखील होते. आता चाहत्यांना दीपिकाच्या ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे. या चित्रपटामध्ये दीपिका एसीपी शक्ती शेट्टी (लेडी सिंघम) या भूमिकेत दिसणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number